Igatpuri Rave Party: ‘बिग बॉस मराठी’ फेम हीना पांचाळ हिच्यासह 25 जणांना न्यायालयीन कोठडी; इगतपूरी रेव्ह पार्टी प्रकरण
या 25 जणांमध्ये बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) फेम हीना पांचाळ (Heena Panchal) हिचाही समावेश आहे. या सर्वांना रेव्ह पार्टी प्रकरणी अटक झाली होती. नाशिक पोलिसांनी या सर्व संशयित आरोपींना नाशिक सत्र न्यायालयासमोर हजर केले होते.
नाशिक (Nashik ) येथील इगतपुरी रेव्ह पार्टी (Igatpuri Rave Party) प्रकरणी चर्चेत आलेल्या 25 जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या 25 जणांमध्ये बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) फेम हीना पांचाळ (Heena Panchal) हिचाही समावेश आहे. या सर्वांना रेव्ह पार्टी प्रकरणी अटक झाली होती. नाशिक पोलिसांनी या सर्व संशयित आरोपींना नाशिक सत्र न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील स्काय ताजआमि स्काय लगून या दोन बंगल्यांमध्ये रेव्ह पार्टी सुरु होती. पोलिसांना या पार्टीची खबर लागताच पोलिसांनी छापा टाकून 25 जणांना अटक केली होती. छापा टाकला तेव्हा पोलिसांनी ड्रग्ज, दारु, कॅमेरा आणि इतर साहित्य हस्तगत केले होते.
रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा सरकारी वकील मिलींद निर्लेकर यांनी बाजू मांडली. निर्लेकर म्हणाले की, या प्रकरणातील आरोपींनी अंमली पदार्थ सोबत बाळगले, सेवन केले आणि त्याचा वापरही केला. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी आरोपींना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात यावे. सरकारी वकिलांच्या युक्तीवादानंतर एकूण 25 आरोपींपैकी तीन कामगार, एक फोटोग्राफर, एक स्वयंपाकी अशा 5 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यांना एक दिवसासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. (हेही वाचा, Rave Party In Igatpuri: इगतपूरी रेव्ह पार्टी प्रकरणी ‘Bigg Boss Marathi’ फेम Heennaa Panchaal हिस अटक, दाक्षिणात्य अभिनेत्रीही ताब्यात)
नाशिक पोलिसांनी रेव्ह पार्टी उधळून लावली तेव्हा घटनास्थळावरुन एकूण 22 जणांना ताब्यात घेतले. यात 10 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. त्या वेळी कारवाई सुरु असताना काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, ज्या बंगल्यांमध्ये ही पार्टी सुरु होती त्या 'स्काय व्हिला' या बंगल्यावरील स्टाफलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांमध्ये एक इटालीयन महिला, मराठी आणि दक्षिणात्या अभिनय आणि मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्री, बॉलिवूडमधील दोन महिला कोरिओग्राफर यांच्यासर इतर काहींचा समावेश होता.
रेव्ह पार्टीमुळे चर्चेत असलेली हिना पांचाळ हे मराठी, काही प्रमाणात हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन इंडस्ट्रीत परिचयाचे नाव आहे. हिना पांचाळ या आधी ‘बिग बॉस मराठी’ या टीव्ही शोमध्ये झळकली आहे. बिगबॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात तिने वाईल्ड कार्ड एण्ट्री मिळवली होती. याशिवाय तिने हुक्का, बेबो बेबो, मोहल्ला, बोगन, राजू ओ राजू, अशा काही चित्रपटात आणि काम केले आहे. तर काही मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटात तिने आयटम सॉन्गही केली आहेत. याशिवाय तिला अभिनेत्री मलायका अरोराची लूक-अलाईक म्हणूनही ओळखले जाते. (हेही वाचा, Nashik Rave Party: इगतपुरी मध्ये रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; बिग बॉस फेम महिला अभिनेत्रीसह 22 जण ताब्यात)