'परप्रांतीय मजूर पुन्हा जर महाराष्ट्रात येणार असतील तर...'; मनसे नेते अमित ठाकरे यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागणी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला होता. दरम्यान, अनेक राज्यातील मजूर महाराष्ट्रात अडकून पडले होते. परंतु, या 3 जूनपासून राज्यात लॉकडाउनच्या काही नियमांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे.

Amit Raj Thackeray | Photo Credits: Instagram

कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला होता. दरम्यान, अनेक राज्यातील मजूर महाराष्ट्रात अडकून पडले होते. परंतु, या 3 जूनपासून राज्यात लॉकडाउनच्या काही नियमांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली आहे. परप्रांतीय मजूर पुन्हा जर महाराष्ट्रात येणार असतील तर, 'आंतरराज्यीय स्थलांतर कायद्यान्वये' नोंदणी व वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात यावा आहे. तसेच परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रीय बांधवांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी राजपालांकडे केली आहे.

अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर, पक्षाचे आमदार राजू पाटील, सरचिटणीस शालीनी ठाकरे आणि इतर पदाधिकारी अशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली आहे. याच दरम्यान अमित ठाकरे यांनी राज्यपालांकडे विविध मागणी केल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथील घाटकोपर परिसरात चीन विरोधात आंदोलन पुकारल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- 'थोरातांची कमळा' गाजला मात्र 'विखे-पाटलांची कमळा' चित्रपट आला व पडला- शिवसेना

मनसेचे ट्वीट-

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. ज्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने 65हजारांचा टप्पा ओलंडला आहे. यापैकी एकूण 1 लाख 32 हजार 75 रुग्णांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 65 हजार 744 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे राज्यातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत आहे.