Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, नितीन करीर यांच्याकडून स्वीकारणार पदभार

एक वर्षाच्या कर्यकाळासाठी सौनिक या राज्याच्या मुख्य सचिवपदी काम करतील.

Photo Credit - X

Sujata Saunik : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक (Sujata Saunik IAS) यांची नियुक्ती झाली आहे. एक वर्षाच्या कर्यकाळासाठी सौनिक या राज्याच्या मुख्य सचिवपदी काम करतील. म्हणजेच जून 2025 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. विशेष म्हणजे या पदावर विराजमान होणाऱ्या सुजाता सौनिक या पहिल्या महिला अधिकारी आहेत. सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे.

सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनीदेखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. रविवारी संध्याकाळी 5 वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली.राज्याच्या मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत प्रामुख्याने तीन नावे आघाडीवर होती. त्यात 1987 च्या तुकडीतील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (1988) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (1989) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात आहेत. त्यामध्ये सेवाज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

नितीन करीर हे मुख्य सचिव होते. त्यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता या पदावर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली.