IPL Auction 2025 Live

IAS Officer Transfers in Maharashtra: तुकाराम मुंढे ते जी श्रीकांत यांच्या खांद्यावर पहा आता कोणती नवी जबाबदारी

नितीन करीर हे आता अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Bhagwant Mann | (Photo Credit : Twitter)

महाराष्ट्र राज्य सरकार कडून आज 10 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेला जी श्रीकांत (G.Sreekanth) हे नवे आयुक्त मिळाले आहेत. तर पी शिवशंकर (P Shivshankar) यांच्याकडे शिर्डी संस्थानच्या सीईओ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चर्चित अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना अखेर कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

डॉ. नितीन करीर हे आता अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ते 1998 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डी.टी.वाघमारे यांची गृहविभागाच्या PS (A&S) म्हणून नियुक्ती झाली आहे.

श्रीमती राधिका रस्तोगी) यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव पदी बदली झाली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांना महापारेषण विभाागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी श्रावण हर्डीकर यांना देण्यात आली आहे. डॉ. अभिजित चौधरी यांना राज्य कर विभागात छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.