IPL Auction 2025 Live

Rajan Vichare on Eknath Shinde: 'तुमच्यासारखा गद्दार नाही, मला बोलायला लावू नका', उद्धव ठाकरे यांचे 'ठाणे'दार राजन विचारे एकनाथ शिंदे यांच्यावर बरसले

सर्वसामान्य कर्तकर्ता म्हणून काम केलंय. सभागृह नेते पद मी यांच्यासाठी सोडलं. तुम्ही चित्रपट काढला दिघेंवर कुठे पैसा खर्च केला. मी शो घेतले कार्यकर्तांच्या पैशाने चित्रपट काढला. महापालिका ठाणेची वाट तुम्ही लावली आणि तुम्ही काय बोलताय? असा सवालही राजन विचारे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार राजन विचारे यांच्यावर टीका केली होती. यानंतर राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्‍यावर जोरदार टीका केली. "तुमच्यासारखा गद्दार नाही, मला बोलायला लावू नका, उरली सुरली राहू द्या. नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जात होता, उद्धव ठाकरे म्हणाले म्हणून त्याला मी थांबवलं. याच नरेश म्हस्केला राजन विचारे घेऊन आला होता. तो काँग्रेसमध्ये चालला होता, शिवाजी मैदानमध्ये त्याचा प्रवेश होता. त्यावेळेला मी त्याला थांबवले", असे म्हणत ठाकरे गटाचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. (हेही वाचा - Raj Thackeray: पुण्यात मुरळीधर मोहोळसाठी 10 मे रोजी राज ठाकरेंची सभा)

ठाण्यात राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी विचारपूस करण्याचे सोडून त्यांची संपत्ती कोठे आहे? याची उद्धव ठाकरे चौकशी करत होती, असा आरोप मुख्यमंत्री एकना शिंदे  यांनी केला होता. त्यानंतर राजन विचारे  यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. शिवाय नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते, त्यांना शिवसेनेत ठेवण्यासाठी मी प्रयत्न केले, असंही राजन विचारे यांनी म्हटलं आहे.

राजन विचारेंना वाऱ्यावर सोडून एकनाथ शिंदे कल्याणला गेले होते, तेव्हा वृत्तपत्रांमध्ये बातम्याही आल्या होत्या. त्याही परिस्थितीत मी निवडणूक लढलो आणि निवडून आलो. फक्त त्यांचा मुलगा आणि ते एवढंच त्यांचं राजकारण होते. माझ्याकडे खोके नव्हते, मी पैशाच्या जीवावर निवडून आलो नाही. आनंद दिघे आणि उद्धव ठाकरेंमुळे मला सर्वकाही मिळालं. असे देखील राजन विचारे यांनी म्हटले आहे.