Maharashtra Board Supplementary Results 2019: HSC आणि SSC च्या पुरवणी परिक्षेचा निकाल 20- 25 ऑगस्ट दरम्यान लागण्याची शक्यता, विद्यार्थ्यांना maharesults.nic.in वर पाहता येणार

महाराष्ट्र बोर्ड लवकरच अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परिक्षेचे निकाल येत्या 20-25 ऑगस्ट दरम्यान जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

Maharashtra Board Supplementary Results 2019: HSC आणि SSC च्या पुरवणी परिक्षेचा निकाल 20- 25 ऑगस्ट दरम्यान लागण्याची शक्यता, विद्यार्थ्यांना maharesults.nic.in वर पाहता येणार
Results 2019 (Photo Credits: Facebook)

Maharashtra Board Supplementary Results 2019: महाराष्ट्र बोर्ड लवकरच अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परिक्षेचे निकाल येत्या 20-25 ऑगस्ट दरम्यान जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन हे प्रत्येक वेळी ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करते. त्यामुळे यंदासुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहेत.

बोर्डाने बारावीची पुरवणी परिक्षा 17 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान घेतली होती. तर अकरावीची पुरवणी परिक्षा 17 जुलै ते 30 जुलै दरम्यान पार पडली होती. मात्र आता लवकरच या परिक्षेचे निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षात MSBSHSE पुरवणी परिक्षेचे निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात आले होते. मात्र यंदा कोणत्या तारखेला पुरवणी परिक्षेचा निकाल जाहीर होणार हे अद्याप ठरवण्यात आलेले नाही. परंतु विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट maharesults.nic.in येथे निकाल पाहता येणार आहेत.(अकरावी प्रवेशासाठी पुढील वर्षी इन हाऊस कोट्याला कात्री, आरक्षण 103% वर गेल्याने शासनाचा निर्णय)

या वर्षी बारावीची परिक्षा मार्चमध्ये पार पडण्यात आल्यानंतर 28 मे रोजी त्याचे निकाल जाहीर करण्यात आले. तसेच बारावी बोर्ड परिक्षेसाठी 14,21,936 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून त्यामधील 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दहावी बोर्ड परिक्षेच्या निकालाचा टक्का घसरला असून 77.10 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2019 01:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).