Maharashtra Board 12th Result: बारावीचा निकाल आज दुपारी 1वाजता mahresult.nic.in वर लागणार, ऑनलाईन वेबसाईट व SMSच्या माध्यमातून असा पहा निकाल

HSC परीक्षेचा बहुप्रतीक्षित निकाल आज मंगळवारी दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळेल.

Exam Result | Image used for representational purpose | Photo Credits: commons.wikimedia and unsplash.com

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल (HSC Result) आज म्हणजेच 28 मे ला दुपारी 1 वाजल्यापासून बोअर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे. यंदा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान HSC बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती त्यानंतर दरवर्षी प्रमाणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होणार अशी चर्चा ऐकू येत होती मात्र काल याबाबत शिक्षण मंडळाकडून शिक्कामोर्तब झाले आहे.

विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांचा वापर करावा

-http://mahresult.nic.in

-www.mahresult.nic.in

-ww.resul.mkcl.org

-www.maharashtraeducation.com

निकाल बघताना खालील सोप्प्या स्टेप्स फॉलो करा

- mahresult.nic.in ही किंवा वर दिल्यापैकी बोर्डाची कोणतीही अधिकृत वेबसाईट सुरु करा.

-अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा पर्याय दिसेल.

त्यानंतर HSC Examination Result 2019 वर क्लिक करा

-आता तुम्हांला एका नव्या विंडोवर रिडीरेकट केलं जाईल, तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करायचं आहे.

-त्यापुढे View Result वर क्लिक करा

-तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हांला तुमचा निकाल पाहता येईल

-तुमच्या निकालाची प्रिंट आऊट काढण्याची, सेव्ह करण्याची सोय आहे.

जर तुमच्याकडे बीएसएनएल नेटवर्क असेल तर तुम्ही एसएमएसद्वारेही निकाल पाहू शकता. यासाठी MHHSC असा एसएमएस 57766 वर पाठवून तुम्ही निकाल प्राप्त करू शकता.

Maharashtra Board SSC HSC Results 2019: 12,10 वीचा निकाल लवकरच; मेडिकल, इंजिनियरिंग ते FYJC अ‍ॅडमिशन साठी राखीव कोट्यात आरक्षणाचा फायदा मिळवण्यसाठी ही 5 सरकारी कागदपत्र ठेवा तयार

गुणांची फेरतपासणी करायची असल्यास...

बारावीचा निकाल आज जाहीर झाल्यावर जर तुम्हाला अपेक्षेप्रमाणे मार्क मिळालेलं नसतील तर रिचेकिंग म्हणजेच गुणांची फेर पडताळणी करायचा पर्याय वापरता येईल. यासाठी निकालांनंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत. रिचेकिंग प्रक्रिया 29 मे ते 7  जून या कालावधीत होणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 29 मे ते 17 जून पर्यंत अर्ज करता येईल. रिपीट एक्साम म्हणजेच पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणे जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif