कोरोनानंतर जमीनीच्या दरात वाढ, अलिबाग मध्ये तब्बल 80 कोटी रुपयांना विक्री केले घर
अशातच अलीबाग मधील एका गावात समुद्र किनारी असलेले 6 एकरवरील एक घर 80 कोटी रुपयांना विक्री केले गेले आहे.
कोरोना महारोगामुळे देशात लॉकडाउन नंतर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात जमीनीच्या किंमतीत वाढ झाली आहे. अशातच अलीबाग मधील एका गावात समुद्र किनारी असलेले 6 एकरवरील एक घर 80 कोटी रुपयांना विक्री केले गेले आहे. रिपोर्ट्सनुसार एका पासरी व्यावसायिक परिवाराने आपली संपत्ती रिटेल किंग आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदार देशात आपली वेगळीच ओळख बनवलेल्या अरबपति राधाकिशन दमानी यांची पत्नी श्रीकांतदेवी दमानी यांना विक्री केले आहे.
डी-मार्टचे फाउंडर राधाकिशन दमानी यांनी गेल्या वर्षात दक्षिण मुंबईतील मलबार हिल्समध्ये 1001 मध्ये कोटी रुपयांचे घर खरेदी केले होते. हे घर देशातील सर्वाधिक महागडा बंगला असल्याचे म्हटले जाते. दमानी यांनी हा बंगला आपला लहान भाऊ गोपीकिशन दमानी यांच्यासोबत मिळून खरेदी केला होता. राधाकिशन दमानी यांनी 2015 मध्ये 138 कोटी रुपयांचे फाइव्ह स्टार रॅडिसन ब्लू रिजॉर्ट अॅन्ड स्पा विकत घेतले होते. स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की,परिवाराचे जिराड गावात 20 एकर जमिनीवर पसरलेले एक मोठे फार्महाउस सुद्धा आहे.(Mumbai Fire Update: करी रोड येथील अविघ्न पार्कला लागलेल्या आगीच्या दुर्घटनास्थळी आदित्य ठाकरे दाखल, अग्नीसुरक्षिततेच्या मुद्द्यावर दिली 'अशी' प्रतिक्रिया)
रिपोर्टमध्ये सुत्रांनुसार असे म्हटले की, लॉकडाउन दरम्यान सोशल मीडियात मोठ्या मोठ्या बागेत, समुद्र किनारी आणि जॉगिंगच्या ठिकाणी पुर आला होता. सुत्रांच्या हवाल्याने असे ही सांगितले जाते की, अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी माझगांवात 22 कोटी रुपयांचे एक घर खरेदी केले आहे. नुकत्याच मुंबई आणि मांडवा दरम्यान फेरी सेवा सुरु झाल्यानंतर मांडवा मध्ये सुद्धा जमीनीच्या किंमतीत 50 टक्के वाढ झाली आहे.
डी-मार्टचे फाउंडर राधाकिशन दमानी यांनी दक्षिण मुंबईत खरेदी केलेला मधुकुंज हा बंगला 1.5 एकर जमिनीवर बांधण्यात आला आहे. याचा एकूण बिल्ट अप एरिया जवळजवळ 61,916 वर्ग फूट आहे. हा बंगला खरदी करण्याासाठी राधाकिशन दमानी यांच्या परिवाराने 30 कोटी रुपयांची स्टँम्प ड्युटी दिली होती.