Mankhurd Violence: मानखुर्दमधील तोडफोडीच्या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांचा इशारा
या घटनेवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की, या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
मानखुर्दच्या (Mankhurd) न्यू म्हाडा वसाहतीमध्ये (New Mhada Colony) रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कडक बंदोबस्त तैनात केला होता. या हल्ल्यात कार आणि ऑटोसह किमान 25 वाहनांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आणि हल्ल्यामागील कारण ओळखण्यासाठी तपास सुरू आहे. ही घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यात काही पुरुष रॉड आणि तलवारीने वाहनांची तोडफोड करताना दिसत आहेत.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले की, या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पाटील यांनी सर्व समाजातील लोकांनी शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. हेही वाचा Sharad Pawar On BJP: शरद पवारांची भाजपवर जोरदार टीका, म्हणाले समाजातील एकात्मतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू
ते म्हणाले की, काही राजकीय पक्षांचे सदस्य प्रक्षोभक विधाने देत आहेत. ज्यामुळे समुदायांमधील वैर वाढू शकते. गृहमंत्री म्हणाले, राज्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात जातीय सलोखा राखण्यासाठी कृपया आम्हाला सहकार्य करा.