HM Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाच्या दर्शनासह भेटीगाठींचा सिलसीला
दरम्यान अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Central Home Minister Amit Shah) आज मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. दरम्यान अमित शाह (Amit Shah) लालबागच्या राजाचं (Laubaug Cha Raja) घेणार दर्शन घेणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभुमिवर शाहांच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे. या दौऱ्या दरम्यान अमित शाह (Amit Shah) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या घरी भोजन आणि बैठकीसाठी जाणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शासकीय निवास स्थानी वर्षा बंगल्यावर जावून गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. तर मुंबई भाजप (Mumbai BJP) अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) या नेत्यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतील. अमित शाहांच्या (Amit Shah) या दौऱ्याला गणपती दर्शन स्पेशल दौरा अशीही चर्चा आहे. तरी राज्यातील सत्तातरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांचा हा पहिलाचं दौरा असल्याने हा दौरा राज्यातील राजकीय दृष्या महत्वाचा आहे.
अमित शाह (Amit Shah) काल रात्री मुंबईत (Mumbai) दाखल झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी त्यांचे स्वागत केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) आज महत्त्वाच्या बैठका घेणार असल्याची माहिती आहे. तसेच दौऱ्यावेळी अमित शाह (Amit Shah) अनेक महत्त्वाच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही (Raj Thackeray) भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. पण कोरोना (Corona) महामारीनंतर (Pandemic) या वर्षी पहिल्यांदाचं गणोशोत्सव (Ganpati Festival) पार पडत आहे. तरी अमित शाहांची ही उपस्थिती लक्षणीय आहे. दरम्यान शाह मुंबईचं राधाय दैवत सिध्दविनायकाचं (Siddhivinayak) देखील दर्शन घेणार आहेत. गृहमंत्री अमित शाहांच्या (Home Minister Amit Shah) या दौऱ्याच्या पार्श्वभुमिवर शहरात कडोकोट बंदोबस्त असणार आहे. (हे ही वाचा:- Ghulam Nabi Azad: मी माझ्या पक्षाला हिंदुस्थानी नाव देईन, गुलाम नबी आझादांची मोठी घोषणा)
)
लाडक्या बाप्पाचं आगमन अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलं आहे. मुंबईतील (Mumbai) लालबागच्या राज्याच्या (Lalbaug Cha Raja) दर्शनाला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. राजकारणी असो सिनेअभिनेते वा उद्योगपती लालबाबग (Lalbaug Cha Raja) राज्याच्या चरणी सगळेचं नतमस्तक होतात. म्हणूनचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा (Home Minister Amit Shah) हा मुंबई दौरा विशेष आहे. तरी या दौऱ्या दरम्यान राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.