मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी अमित शहा व जे पी नड्डा राहणार उपस्थित, विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखण्याची शक्यता
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या महाजानदेश यात्रेचा दुसऱ्या टप्प्याचा सोलापूर येथेसमारोप होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांची प्रमुख उपस्थिती असेल
महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Elections 2019) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली महाजानदेश यात्रा (Mahajandesh Yatra) काढण्यात आली आहे. रविवारी 1 सप्टेंबर रोजी सोलापूर (Solapur) येथे महाजानदेश यात्रेचा दुसऱ्या टप्प्याचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा (J.P. Nadda) यांची प्रमुख उपस्थिती असेल याविषयी यात्रा प्रमुख व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली. याशिवाय जालना (Jalna) येथे 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेलाही शहा व नड्डा उपस्थित राहणार आहेत. (BJP Maha Janadesh Yatra: भाजप हाऊसफुल, आमची मेगाभरती नव्हे तर, लिमिटेड भरती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
दरम्यान, सध्या महाराष्ट्रात पक्षांतराचे सत्र सुरु आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते आता भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश घेत आहेत. विधानसभा निवडणुकांआधी हा विरोधी पक्षांसाठी मोठा धक्का सिद्ध होऊ शकतो. तर दसुरीकडे, विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेना अर्ध्या अर्ध्या जागांवर निवडणुका लढवणार आहेत. काही दिवसांपूर्वी याबाबत शिवसेना युवासेना प्रमुख वरुण सरदेसाई यांनी माहिती देत सत्ता आल्यास अडीच वर्षासाठी दोन्ही पावसाचा मुख्यमंत्री असेल अशी शक्यता वर्तवली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)