Holi 2020: होळी सणाच्या बंदोबस्तासाठी तब्बल 40 हजारांहून अधिक पोलीस मुंबईच्या रस्त्यांवर तैनात

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ता प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ), दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोध आणि विल्हेवाट पथकाचे कर्मचारी आणि सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरवर्तन होऊ नये म्हणून वाहतूक पोलिस बंदोबस्त ठेवणार आहेत.

Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

Holi Festival 2020: कोरोना व्हायरसची भीती कायम आहे. तरीही नागरिक होळीचा सण साजरा करणार हे जवळपास नक्की आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आणि होळी (Holi) सण कोणताही अनुचीत प्रकार न घडता आनंदाच साजरा व्हावा यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) सज्ज आहेत. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 40 हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी मुंबईच्या रस्त्यांवर (Mumbai Streets) तैनात आहेत. यात पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

राज्यभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. होळीच्या सणानिमित्त रंगांची उधळण होते. नागरिक मोठ्या आनंदाने या सणात सहभागी होतात. दरम्यान, याच वेळी काही समाजकंटक अनुचीत प्रकार घडवून आणून सणाच्या आनंदावर विरजन घालण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा समाजकंटकांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ता प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ), दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोध आणि विल्हेवाट पथकाचे कर्मचारी आणि सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरवर्तन होऊ नये म्हणून वाहतूक पोलिस बंदोबस्त ठेवणार आहेत.

ज्या ठिकाणी होळी साजरी करण्यासाठी पुष्कळ लोक एकत्र येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी म्हणजेच मुंबईतील समुद्रकिनारे, महत्वाची उपास, प्रार्थनास्थळे, मॉल्स आणि राजकीय नेते आणि महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ आणि परिसरात पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, "सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे शहरातील (उत्सवाच्या काळात) घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवेल आणि नियमांचे उल्लंघन करणारे आणि गैरवर्तन करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Holi 2020 Skin Care Tips: धुळवड, रंगपंचमी दिवशी होळीच्या रंगांत माखण्यापूर्वी त्वचेचं नुकसान टाळण्यासाठी 'या' गोष्टी नक्की कराच!)

होळीसाठी झाडांची कत्तल करणाऱ्या, अपरिचीत लोकांवर पाण्याचे फुगे फेकणाऱ्या तसेच, पाण्याचा अपव्यय करणाऱ्या लोकांवरही कायद्याला अनुसरुन कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी नागरी भागातील पोलिस कर्मचारी सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहतील. मद्यपान अथवा नशा करुन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईचे संकेतही पोलिसांनी दिले आहेत.