Hoarding Collapse Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा १८ वर; उपचारादरम्यान मृत्यू, चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

या मृतांमध्ये आता आणखी दोघांची भर पडली आहे.

Hoarding | Twitter

Hoarding Collapse Accident: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत (Ghatkopar Hoarding Collapse) १६ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये आता आणखी दोघांची भर पडली आहे. होर्डिंग कोसळून जखमी झालेल्या आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत मृतांचा एकूण आकडा पाहिला तर तो १८ वर गेला आहे. मृतांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय, महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणी आता चौकशीसाठी एसआयटी(SIT)ची स्थापना करण्यात आली आहे. (हेही वाचा:Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य अखेर पूर्ण; मृतांचा आकडा 16 वर, 75 जखमी )

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या अनधिकृत होर्डिंगचा मालक भावेश भिंडे याला अटक केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर हे एसआयटीचं नेतृत्व करणार आहेत. (हेही वाचा:Ghatkopar Hoarding Collapse Accident: मुंबईमध्ये नवीन होर्डिंग लावण्याची परवानगी दिली जाणार नाही; घाटकोपर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय )

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ७० हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणातील इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेला सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा अंतर्गत अटक करण्यात आली आहे. रविवारी मुंबईत झालेल्या वादळी पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी कोणत्या कोणत्या दुर्घटना घडल्या होत्या. काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले होते. काही ठिकाणी झाडे पडली होती.