Hingoli Crime: धक्कादायक! हिंगोलीत गुप्तांग कापलेले नग्नावस्थेत सापडला मृतदेह, पोलिस तपास सुरु
हिंगोली पोलिस कारवाईसाठी पोहचले असता हा प्रकार बघून पोलिसही चक्रावले आहेत.
खून (Murder), गुन्हा (Crime) अशा बऱ्याच बातम्या तुमच्या कानावर पडत असेल पण विकृतीपूर्ण क्रूर घटनेचं प्रमाण हल्ली वाढत चाल्ल आहे. असाच काहीसा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District) वसमत तालुक्यात घडला आहे. शहरातील कवठा रोड परीसरातील स्मशानभूमीत एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह नग्नअवस्थेत (Nude Dead Body) सापडला असुन या मृतदेहाचे गुप्तांग कापलेले आहे. हिंगोली पोलिस (Hingoli Police) कारवाईसाठी पोहचले असता हा प्रकार बघून पोलिसही (Police) चक्रावले आहेत. कारण सापडलेला हा मृतदेह (Dead Body) 20 वर्षीय तरुणाचा असुन कुजलेल्या अवस्थेत हा सापडला आहे. त्यामुळे हा तरुण नेमका कोण, त्याची ओळख पटणं अवघड झालं होतं.
मृतदेहाची (Dead Body) पाहणी करत असताना मृताचे आधार कार्ड (Aadhar Card) सापडल्याने त्याची ओळख पटली. असलम सरफराज (Aslam Sarfaraz) असे या मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव असुन या तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील गुप्तांग कापलेले असून शरीरावर जखमा असणाऱ्या अवस्थेत या तरुणाचा मृतदेह आढळून आला. शहर पोलिसांनी घटनास्थळाची पूर्ण पाहणी करून तपास सुरू आहे. या घटनेमुळे वसमत शहरांमध्ये खळबळ उडाली आहे. (हे ही वाचा:- Dombivli: प्रेम प्रकरणातून तरुणाने रचला स्वत:च्या अपहरणाचा कट, ऐकून तुम्ही देखील व्हाल थक्क)
हिंगोली पोलिस या घटनेचा सविस्तर तपास करीत आहेत. घडलेली घटना ही प्रेम प्रकरणांतून घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून, तशा प्रकारे नागरिकांमधून दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळते आहे. तरीहा क्रूर हत्येमागे कुणीतरी विकृत गुन्हेगार असल्याचं बोल्ल्या जात आहे.