Hinganghat Burning Case: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावणी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात सुरु होईल- उज्ज्वल निकम

मात्र आरोपीचा वकिल हा गैरहजर राहिल्याने 17 डिसेंबर ही तारीख देण्यात आली. याच दिवशी आरोप निश्चित होतील अशी माहिती ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनी दिली.

Ujjwal Nikam (Photo Credit: Facebook)

हिंगणघाट (Hinganghat Burning Case) येथे 3 फेब्रुवारी 2020 रोजी झालेले जळीतकांड प्रकरण आजही लोकांच्या मनात घर करुन आहे. एका प्राध्यापिक तरुणीला एकतर्फी प्रेमातून आरोपीने भररस्त्यात जिवंत जाळले होते. या घटनेची काल (14 डिसेंबर) कोर्टात सुनावणी सुरु झाली. याबाबत अधिक माहिती देत सरकारी उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी येत्या 17 डिसेंबरला आरोप निश्चित होतील असे सांगितले. या प्रकरणातील मुख्य आरोपी विकेश नगराळे (Vikesh Nagrale) याला कोर्टात आणण्यात आले होते. मात्र आरोपीचा वकिल हा गैरहजर राहिल्याने 17 डिसेंबर ही तारीख देण्यात आली. याच दिवशी आरोप निश्चित होतील अशी माहिती ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनी दिली.

तसेच या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी, पुराव्यांची प्रत्यक्ष सुनावणी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात होईल. उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात सरकारी वकिल म्हणून ही माहिती दिली आहे. आरोपीचे वकिल काल गैरहजर होते. म्हणून 17 डिसेंबर ही तारीख देण्यात आली. दरम्यान काल उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर आरोपपत्र सादर केले. त्यामुळे येत्या 17 डिसेंबरला सर्व विकेश नगराळेवरील सर्व आरोप सिद्ध होतील असे त्यांनी सांगितले आणि त्यानंतर 15 दिवसांनी प्रत्यक्षदर्शी, अन्य पुराव्यांची प्रत्यक्ष सुनावणी सुरु होईल असेही त्यांनी सांगितले.हेदेखील वाचा-Hinganghat Burning Case: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात, काय होतं नेमकं प्रकरण?

नेमकं काय घडलं होते 3 फेब्रुवारीला?

1. 3 फेब्रुवारीला सकाळी 7.15 वाजता हिंगणघाटच्या नंदोरी चौकातून ही तरुणी जात असता आरोपी विकेश अचानक तिच्यासमोर आला आणि आपल्या हातातील पेट्रोलची बाटली तिच्या अंगावर टाकली आणि टेंभ्याने तिला आग लावून पेटवून दिले. यानंतर तेथील नागरिकांनी तिची आग विझवून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. यात ती 40% भाजली होती. याआधाही आरोपी विकेशने तिला त्रास दिला होता. त्यावेळी पीडित तरुणीच्या पालकांनी त्याला समज दिली होती. पीडितेला पुढील उपचारासाठी नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं होतं. येथे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र 9 फेब्रुवारीला या तरुणीचे उपचारादरम्यान निधन झाले.

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची राज्य सरकारची घोषणा होताच प्रसिद्ध वकिल उज्ज्वल निकम हे सरकारतर्फे पीडितेची बाजू मांडणार आहे असे सांगण्यात आले. त्यामुळे आता सर्व या घटनेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे.