High Tide in Mumbai 4th September: आज दुपारी 3 वाजून 17 मिनिटांच्या सुमारास समुद्रात उसळणार 4.18 मीटरच्या लाटा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

आज दुपारी समुद्रात 4.18 मीटर उंच (13.71ft) लाटा उसळणार असल्याची माहिती भरतीचा अंदाज वर्तवणाऱ्या विभागातर्फ़े देण्यात आली आहे. यामुळे साहजिकच मुंबईकरांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

High Tide (Photo Credits: Facebook)

High Tide in Mumbai: मुसळधार पावसाने मागील दोन दिवसांपासून मुंबई सह, नवी मुंबई, ठाणे सह उपनगरांना अक्षरशः झोडपून काढले आहे. परिणामी ठिकठिकाणी रस्त्यावर, रेल्वे ट्रॅक वर, पाणी साचून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.अशातच आज दुपारी समुद्रात 4.18 मीटर उंच (13.71ft) लाटा उसळणार असल्याची माहिती भरतीचा अंदाज वर्तवणाऱ्या विभागातर्फ़े(Tide Forecast)  देण्यात आली आहे. यामुळे साहजिकच मुंबईकरांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. पावसाचे हे रौद्र रूप पाहता महापालिका (BMC)  व पोलिसांतर्फे (Mumbai Police)  नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भरतीच्या काळात समुद्राच्या जवळच्या परिसरात न जाण्याचे सूचित करण्यात आले आहे.

इथे पहा आजच्या High Tide चे वेळापत्रक

Tide Height Time (IST) Date
High 4.23m (13.88ft) 3:13am Wed 04 September
Low 1.21m (3.97ft) 9:14am Wed 04 September
High 4.18m (13.71ft) 3:17pm Wed 04 September
Low 0.70m (2.30ft) 9:43pm Wed 04 September

Maharashtra Monsoon 2019 Live Updates: पश्चिम रेल्वेवर वसई- विरार दरम्यान वाहतूक स्थगित, नालासोपारा येथे रेल्वे रूळ पाण्याखाली

दरम्यान आज, सकाळपासून पावसाचा जोर वाढला असल्याने वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे, मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलच्या मध्य, मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. तर पश्चिम व हार्बर मार्गांवरील वाहतूक उशिराने धावत आहे. तर रस्त्यावरही ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हवामान खात्यातर्फे देखील मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई, ठाणे परिसरातील खाजगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now