Maharashtra Rain: राज्यात पावसाचा धुमाकुळ, पुण्यात अनेक भागात पाणी साचले; यवतमाळमध्ये दुचाकी वाहून गेल्या

अर्धा तास झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. पुण्यात अनेक भागात पाणी साचले होते. तर, यवतमाळमध्ये दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली.

Photo Credit- X

Mahatrashtra Rain: राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाले आहे. पुणे, नाशिकसह मराठावाडा आणि विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये(Nashik Rain) दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्धा तास झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. पुण्यात अनेक भागात पाणी साचले(Pune Rain) होते. तर, यवतमाळमध्ये दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली. सिंधुदुर्गातही पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी भागात जोरदार पाऊस झाला. (हेही वाचा: Nashik Rains: नाशिकमध्ये पावसाचं रौद्ररूप, मुंबई-नाशिक महामार्ग पाण्याखाली (Watch Video))

गेले आठ ते दहा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुनरागमन ल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. नाशिकमध्ये केवळ पावसाने शहराला झोडपून काढले. तेथील रस्त्यांना नद्यांचे रूप आले होते. त्यातूनच नागरिकांना मार्ग काढवा लागला. शहरातील अनेक रस्त्ये पाण्याखाली गेले होते. त्यामुळे, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पुणे शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. हडपसर भागात पावसामुळे पाणीच पाणी झाल्याची परिस्थती निर्माण झाली होती. कालही पुणे जिल्ह्यात पावसाच्या मुसळधार सरी बरलल्या होत्या.

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उखाडा जाणवत होता. त्यामुळे आज विजांच्या कडकडाटासह आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. दारव्हा यवतमाळ महामार्गावर अडान नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली. पुलावरून पाणी जात असतानाच दुचाकी हातात पकडून जाणाऱ्या काही लोकांच्या दुचाकी वाहून गेल्या. सुदैवाने यात कुठलीच जीवितहानी झाली नाही.