Mumbai Thane Heavy Rains: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, पाणीपुरवठा आणि जनजीवन विस्कळीत
काही वेळासाठी नाही म्हणायला उगडीप मिळते आहे. पण, असे असले तरी संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय पाणीपुरठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे.
मुसळधार पावसाची (Heavy Rain) मुंबई आणि ठाण्यात संततधार (Heavy Rain in Mumbai) कायम आहे. काही वेळासाठी नाही म्हणायला उगडीप मिळते आहे. पण, असे असले तरी संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय पाणीपुरठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. कल्याण- डोंबिवली, टिटवाळा परिसरात काही काळासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर ठाणे शहरात (Rain in Thane) तीन-चार दिवस कमी पाणीपुरठा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुसळधार पावसचा तडाखा बुधवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्या मोठा तडाखा बसला. मुबई शहर आणि उपनगरांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे हा परिसर जलमय झाला. बुधवारी मुंबईमध्ये सर्वाधिक पाऊस बरसला. त्यामुळे लोकलवरही परिणाम झाला. मुंबई लोकल विलंबाने धाऊ लागली. त्यामुळे कामावर गेलेल्या, निघालेल्या आणि परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.
ठाणे शहरात पाणी पुरवठा विस्कळीत
ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेला मोठाच फटका बसला. भातसा नदीला पूर आला. पुरामुळे वाहून आलेला गाळ, कचरा पिसे बंधाऱ्याजवळ उपसा करणाऱ्या पंपाच्या मुखाशी अडकला. परिणामी पाणीउपशावर मर्यादा आल्या. त्यामुळे पुढचे तीन ते चार दिवस ठाणे शहरात पाणीपुरवठा कमी प्रमाणात होणार आहे. बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील जीवन प्राधिकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र पुरामुळे बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडूनही खबरदारीचा उपाय म्हणून पाणी जपून वापरण्याचे अवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
दरम्यान, ठाणे, पालघर क्षेत्रातील शाळांना अतिवृष्टीचा इशार देण्यात आला आहे. परिणामी शाळांना पुढचे दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊनही मुंबई विभगांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना स्थानिक प्राधिकरणाने घेतला आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने या सूचना दिल्या आहेत.