Maharashtra Weather Forecast: दमदार पाऊस, मात्र सातत्य खंडीत होण्याची शक्यता; जाणून घ्या उद्याचे हवामान आणि पवसाची आजची स्थिती

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rains) पडतो आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. दुसऱ्या बाजूला हवामान अंदाज (IMD Weather Forecast) व्यक्त करताना उद्यापासून म्हणजेच 14 जून पासून राज्यातील काही भागांमध्ये पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज आणि राज्यातील पावसाची आजची परिस्थीती.

Maharashtra Weather Forecast: दमदार पाऊस, मात्र सातत्य खंडीत होण्याची शक्यता; जाणून घ्या उद्याचे हवामान आणि पवसाची आजची स्थिती
Rain (PC - Twitter/ ANI)

Weather Forecast For Tomorrow: राज्यामध्ये नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचे (Monsoon Rain Updates) दमदार आगमन झाले आहे. यंदाच्या वर्षी मान्सून वेळेच्या आगोदरच दाखल झाला आहे. सोबतच राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rains) पडतो आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. दुसऱ्या बाजूला हवामान अंदाज (IMD Weather Forecast) व्यक्त करताना उद्यापासून म्हणजेच 14 जून पासून राज्यातील काही भागांमध्ये पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज आणि राज्यातील पावसाची आजची परिस्थीती.

आजचा हवामान अंदाज

आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मध्य पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज दमदार पावसाची शक्यता कमी असली तरी वातावरण ढगाळ आणि तुरळक पाऊस पडू शकतो. (हेही वाचा, Mumbai Weather Forecast Today: पुढील 24 तासांत मुंबई शहरात असं राहिलं वातावरण, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज)

यलो अलर्ट असलेले जिल्हे

हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केलेले जिल्हे: धाराशिव, लातूर, बुलढाणा, पुणे, नगर, सोलापूर, अकोला, अमरावती, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा.

कोकणात पावसाचा जोर कमी

मान्सूनचे आगमन झाल्यापासून कोकणामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळत होता. खास करुन सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत दमदार पाऊस कोसळत होता. मात्र, पुढचे काही दिवस पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळू शकते. ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण काहीसे कमी आहे. दरम्यान, कोकणात मात्र पावसाच्या दमदार हजेरीमुळे भाताची खाचरे भरली आहेत. त्यामुळे रपोवाटीकांच्या कामास वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

वावसाच्या गती अनियमित

महाराष्ट्रात काहीसा लवकर आगमन केलेला मान्सून पाऊस सलग पडण्याची शक्यता होती. मात्र, ही शक्यता केवळ शक्यताच ठरली. पावसाच्या गतममध्ये अनियमीतता पाहायला मिळत आहे. खास करुन पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची उघडिप पाहायला मिळत आहे. तर नाशिक, सोलापूर, नगर भागात पावसाचा जोर आणखीच कमी म्हणजे जवळपास नाहीच्या बरोबर आहे. खानदेशामध्ये वातावरण ढगाळ आहे. पण त्याचा परिणामी पाऊस पडण्यात होताना दिसत नाही. नाही म्हणायला चांदवड,नांदगांव, इगतपुरी, देवळा, मालेगाव, येवला, सिन्नर, निफाड आदी ठिकाणी मात्र दमदार पाऊस पाहायला मिळत आहे.

मराठवाड्यात काही ठिकाणी दमदार पाऊस

सलग किंवा अखंड मराठवाडा नाही. मात्र, काही ठिकाणी तुरळक आणि दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. जसे की, लातूर, हिंगोली, धाराशिव व परभणी जिल्ह्यांत दमदार पाऊस पाहायाल मिळाला. मात्र, त्याउलट मराठवाड्यातीलच असलेल्या संभाजीनगर जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत पाठिमागच्या दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस अगदीच कमी राहिल्याचे पाहायाला मिळाले.

विदर्भात हळूहळू जोर

वदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच प्रभाव हळूहळू वाढू लागला आहे. खास करुन लडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून मान्सून आपला प्रभाव दाखवू पाहात आहे. इतर ठिकाणीही तुरळक सरी पाहायला मिळत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2024 10:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).