Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाचा रेड अलर्ट; आठवडाभर पावसाची परिस्थीती असण्याचा हवामान विभागाचा अंदाज
तर पालघर, पुणे, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक शहरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Mumbai Rain Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा(Mumbai Rain) दिला आहे. त्याशिवाय आठवडाभर पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण भागात मुसळधार पावसाचा (Kokan Rain)अंदाज आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याची घटना समोर आली आहे. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. (हेही वाचा: Mumbai Rains Weather Forecast: मुंबई मध्ये काही भागात मुसळधार पाऊस; पहा आजचा हवामान अंदाज काय?)
हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, उत्तर-मध्य महाराष्ट्रावर चक्रीवादळाची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मुंबईत संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहणार असून शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि गोवा भागात आठवडाभर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (हेही वाचा: Pune Weather Today: पुणे शहरामध्ये आज हवामान अंदाज काय?)
उद्या 28 सप्टेंबरपासून मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यकता असल्यास प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे किनारी भागात नागरिकांनी जाणे टाळावे.