Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर; जनजीवन विस्कळीत

सकाळपासून पावसाचे रौद्ररूप पहायला मिळत आहे. परिणामी नद्यानाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Photo Credit- X

Sindhudurg Rain Update: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने (IMD)राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातही पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आज जिल्हात सरासरी 114 मि.मी एवढा पाऊस नोंदवला गेला आहे. मुसळधार पावसामुळे सिंधूदूर्गात (Sindhudurg rain)जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाल्यांना पूर आला असून माणगाव खोऱ्यातील आजिंवडे गावात गेलेली एसटी बस दुकानवाड येथे अडकली आहे. त्याशिवाय जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशीच परिस्थीती आहे. पावसाच्या पाण्यात, दुचाकींसह चारचाकी ही अडकल्या आहेत. (Maharashtra Rain Alert: राज्यात बहुतांश जिलह्यांना पावसाचा अलर्ट; मराठवाडा-विदर्भात तुफान पावसाचा हवामान भागाचा अंदाज)

सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल शुक्रवारी रात्रीपासून पाऊस कोसळत आहे. सकाळी नोंद झालेला तालुकानिहाय पाऊसाची आकडेवारी समोर आली आहे. ज्यात देवगडमध्ये 118.4 मि.मी सर्वाधिक पाऊस झाला. मालवण 130.4मि.मी, सावंतवाडी 114.3 मि.मी, वेंगुर्ले 112.7 मि.मी, कणकवली 71.1 मि.मी, कुडाळ 156.1 मि.मी, वैभववाडी 64.5मि.मी, दोडामार्ग 75.5 एवढा पाऊस नोंदवला गेला आहे.