Nashik Rain: नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरलं पाणी; गंगापूरमधूनही विसर्ग वाढवला (Watch Video)

जिल्ह्यात गेल्या 24 तासात 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरण 80 टक्क्यांहून अधिक भरले आहे.

Photo Credit- X

Nashik Rain: गेल्या दोन दिवसांपासून नाशकात जोरदार पाऊस सरू आहे. शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यांत पावसाची (Heavy Rain) धुवाधार बॅटींग सुरू आहे. मुसळधार पावसाचा फटका त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना (Trimbakeshwar Temple) देखील बसत आहे. मंदिरात भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. चार ते पाच तालुक्यांत पावसाने जोर घेतल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गंगापूर धरण (Gangapur Dam)80 टक्क्यांहून अधिक भरले आहे. उद्यापासून श्रावण महिन्याला (Shravan Month)सुरुवात होत आहे. श्रावणाच्या आदल्या दिवशीच बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या नगरीत भाविक दाखल होत आहेत. (हेही वाचा: Bhatsa Dam Gate Opens: मुसळधार पावसामुळे भातसासह तानसा, मोडकसागर धरणाचे दरवाजे उघडले; नदीकाठी रहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा (Watch Video))

गंगापूरमधून विसर्ग वाढवला

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजता एकूण 500 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला होतेा. दुपारी 3 वाजता 1 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. दुपारी चार वाजेपासून 4 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूरसह दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणातून ही विसर्ग सुरु असल्याने जायकवाडीला नाशिकचे पाणी मिळणार आहे.(हेही वाचा:Pune Flood Alert: संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातील विसर्गामुळे पुराचा धोका; बालेवाडी आणि पिंपरी येथे एनडीआरएफचे पथक तैनात)

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी शिरलं

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या पायऱ्यांवरून मंदिर परिसरात पाणी शिरले आहे. यामुळे दक्षिण दरवाजाजवळील गायत्री मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. यावेळी पाण्याबरोबरच कचरा देखील वाहत आल्याचे दिसून आले आहे. यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरासह बाजारपेठ, मेनरोड, तेली गल्लीत देखील पाणी शिरले आहे. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. श्रावणाच्या आदल्या दिवशीच बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या नगरीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.