Nagpur Rain Updates: नागपूरमध्ये जोरदार पाऊस, लोकांमध्ये ढगफुटीची चर्चा; जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

ज्यामुळे परिसरातील शेतीचेही नुकसान झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शाळांना (जिल्हा आणि महानगर क्षेत्र) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुटी जाहीर केली आहे.

Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

नागपूरमध्ये (Nagpur) मुसळधार पावसामुळे दमदार हजेरी लावली आहे. अचानक इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसल्याने ढगफुटी झाली की काय अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. मुसळधार (Nagpur Rain Updates) पावसामुळे नागनदीला पूर आला आहे. ज्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच वाहनतळावर लावलेली वाहनांमध्येही पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. शहरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. ज्यामुळे परिसरातील शेतीचेही नुकसान झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शाळांना (जिल्हा आणि महानगर क्षेत्र) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सुटी जाहीर केली आहे.

नागपूरमध्ये ढगफुटीसदृश्य पावसामुळे काय घडले?

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात झालेल्या पावसाची नोंद घेतली आहे. एक्सच्या माध्यमातून त्यांनी म्हटले आहे की, नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

ट्विट

दरम्यान, मुसळधार पावसामुळे महापालिका सतर्क झाली असून पालिकेने अलर्ट जारी केला आहे. पालिकेने म्हटले आहे की, मुसळधार पावसाची स्थिती लक्षात घेता नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. कारणाशिवाय पाण्यात उतरु नये. दरम्यान जर काही आपत्कालीन स्थिती आली, निर्माण झाली तर लगेच मनपाला 07122567029 किंवा 07122567777 या क्रमांकावर संपर्क साधा असे अवाहन करण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif