Weather Update In Maharashtra: नागपूर मध्ये उष्णतेने गाठला उच्चांक; विदर्भात पुढील 5 दिवसांसाठी हिट अलर्ट जारी

तर यापाठोपाठ अकोल्यात सुद्धा 46 अंश तापमान नोंदवलेले आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 5 दिवसांसाठी विदर्भ भागात हिट अलर्ट (Heat Alert) जारी करण्यात आला आहे.

Heat (Photo Credits: JBER)

Maharashtra Weather Update: मे महिन्याच्या उत्तरार्धात आता महाराष्ट्रात तापमानाचा (Maharashtra Heatwave)  वाढता पारा पाहायला मिळत आहे. मुंबई (Mumbai), कोकण (Konkan) प्रांतांसह सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका हा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला (Vidarbha)  बसल्याचे समजून येतेय. विदर्भातील 11 पैकी 7  भागात 40 अंश सेल्सियस हुन अधिक तापमाची नोंद झाली आहे. यामध्ये नागपूर (Nagpur)  मध्ये सर्वात जास्त अशा 46.5 डिग्री तापमान नोंदवले गेले. तर यापाठोपाठ अकोल्यात सुद्धा 46 अंश तापमान नोंदवलेले आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या 5 दिवसांसाठी विदर्भ भागात हिट अलर्ट (Heat Alert) जारी करण्यात आला आहे. याबाबत हवामान खात्याच्या नागपूर शाखेचे अधिकारी ब्रिजेश कनोजिया यांनी माहिती दिली.

प्राप्त माहितीनुसार, मागील सलग तीन दिवसांपासून नागपूर मध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे. पुढील काही दिवसात सुद्धा परिस्थिती समान राहण्याचे अंदाज आहेत. अशावेळी नागरिकांनी सर्वतोपरी खबरदारी बाळगावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यात सुद्धा तापमान वाढत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात देशात पावसाचे आगमन होऊ शकते. केरळ मध्ये 1 जून रोजी पाऊस दाखल होणार आहे असेही अंदाज वर्तवण्यात आले होते. यानुसार केरळ मध्ये वेळापत्रकानुसार पाऊस आल्यास देशभरात पावसाचे आगमन सुद्धा वेळेत होईल.