Heatwave in Maharashtra: महाराष्ट्र तापला; उष्माघाताने उस्मानाबाद मध्ये घेतला एका शेतकर्‍याचा बळी

उस्मानाबादमध्येही नुकताच एका 50 वर्षीय शेतकर्‍याचा बळी गेला आहे.

Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रामध्ये वाढतं तापमान सध्या सार्‍यांचीच लाही लाही करत आहे. हवामान विभागाकडून सातत्याने हीट व्हेव बाबत माहिती दिली जात आहे. उन्हाचा कडाका पाहून दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडू नये असे आवाहनही केले जात आहे. पण अगदीच कामासाठी बाहेर पडाल तर काळजी घ्या. राज्यात यंदा मार्च महिन्याच्या शेवटापासूनच उष्माघाताचे बळी गेल्याचं पहायला मिळत आहे. उस्मानाबादमध्येही नुकताच एका 50 वर्षीय शेतकर्‍याचा बळी गेला आहे.

लिंबराज सुकाळे असे या मृत शेतकर्‍याचं नाव आहे. शेतातील काम आवरून तहान लागली म्हणून पाणी प्यायला गेलेल्या लिंबराज सुकाळे यांचा जागीच कोसळून मृत्यू झाला. त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले पण त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. ही घटना उस्मानाबाद मधील कळंब तालुक्यातील हसेगाव येथील आहे. सध्या उस्मानाबादेत पारा 40 अंशाच्या पार गेला आहे. नक्की वाचा: Maharashtra Heatwave Alert: आणखी तीन-चार दिवस राज्यात उष्णतेची तीव्र लाट, IMD कडून काळजी घेण्याचे आव्हान.

उष्माघातापासून बचावण्यासाठी काय कराल?

 

View this post on Instagram

 

A post shared by Maha Arogya IEC Bureau (@mahahealthiec)

उस्मानाबाद पूर्वी महाराष्ट्रात जितेंद्र संजय माळी या 33 वर्षीय तरूण शेतकर्‍याचाही उष्माघाताने बळी घेतला आहे. त्याने दुपारपर्यंत रस्त्यावर खमंग विकले होते. नंतर रणरणत्या उन्हात शेतात काम केलं. शेतातून घरी येत असताना उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यात सारकिन्ही येथे देखील 50 वर्षीय समाधान शामराव शिंदे या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला.