Beed Shocker: लॉजवर प्रेयसीची हत्या, प्रियकराने स्वत:ही गळफास लावून संपवलं आयुष्य; बीड मध्ये नेमकं काय घडलं?

प्रेम प्रकरणातून तरुणाने प्रेयसीचा हत्या केली त्यानंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बीड शहर हादरलं आहे.

Murder And Suicide PC File Image

Beed Shocker: गेल्या दोन दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान बीड (Beed) जिल्ह्यात देखील एक अशीच घटना उघडकीस आली आहे. प्रेम प्रकरणातून तरुणाने प्रेयसीचा हत्या (Murder) केली त्यानंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बीड शहर हादरलं आहे. ही घटना गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील शिवनेरी लॉजमध्ये घडली आहे. महिलेची लॉजवर हत्या केली त्यानंतर गावात येऊन संशयिताने गळफास लावून जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. (हेही वाचा- सेक्सला नकार, पुरुषाकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदकुमार वांडेकर असं हत्या करून आत्महत्या करण्याऱ्या तरुणाचे नाव आहे. हे दोघे जण एकाच गावातील रहिवाशी होते. दोघांचे गेले काही वर्षांपासून प्रेम प्रकरण चालू होते अशी माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली.  दरम्यान मंगळवारी सकाळी 10 वाजता हे दोघेही शिवनेरी लॉजवर गेले. यावेळी त्यांच्यात काही कारणांमुळे वाद झाला. या वादातून आरोपीने महिलेचा गळा आवळून खून केल्याचा संशंय पोलिसांना आला आहे. त्यानंतर नंदकुमार खोलीला चावी लावून बाहेर जाण्याच्या बाहाणा करत लॉजमधून निघून गेला. त्यानंतर तो परतलाच नाही. लॉजच्या मालकाला काहीतरी गडबड असलाचा संशंय वाटल्याने ही माहिती पोलिसांना दिली.

नंदकुमार घटनेनंतर थेट गावात गेला आणि गावातील एका शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना काही वेळानंतर गावात एकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही ठिकाणी येऊन पंचनामे केले. दोघांच्या ही नातेवाईकांना बोलावून घेतले आणि सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरु असल्याची माहिती समोर आली आणि नंदकुमारने प्रेम प्रकरणातून हत्या आणि त्यानंतर आत्महत्या केली असा संशंय आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement