हातकणंगले लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: धैर्यशील माने यांच्याकडून राजू शेट्टी यांच्याविरोधात निकराची झूंज, पाहा आघाडी
स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) हे या मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधत्व करतात. शेतकरी नेता विरुद्ध सहकार सम्राट किंवा प्रस्थापीत असा संघर्ष या मतदारसंघात पाहायला मिळतो.
Hatkanangle Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti), शिवसेना (Shiv Sena ) उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane), वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार अस्लम सय्यद यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (Hatkanangle Lok Sabha constituency) हा राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा मतदारसंघ. स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Saghtana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) हे या मतदारसंघातून लोकसभेवर प्रतिनिधत्व करतात. शेतकरी नेता विरुद्ध सहकार सम्राट किंवा प्रस्थापीत असा संघर्ष या मतदारसंघात पाहायला मिळतो.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघहा काँग्रेस आणि काँग्रेस विचारांशी संबंधीत पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, गेली दोन दशके शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मोडून काढत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी येथून एकहाती विजय संपादन केला. 2014 च्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवेदिता माने आणि राजू शेट्टी यांच्यात चांगलाच सामना पाहायला मिळाला. त्या निवडणुकीत (2014) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना 4 लाख 81 हजार 25 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निवेदिता माने यांना 3 लाख 85 हजार 965 तर, शिवसेना उमेदवार रघुनाथ पाटील यांना 55 हजार 50 मते मिळाली.
दरम्यान, या वेळी रघुनात पाटील हे रिंगणात नाहीत. या मतदारसंघातून माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांना शिवसेनेने रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे हा सामना आत खासदार राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने असा रंगणार आहे.