Happy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो

मुंबईतील (Mumbai) सर्वात मोठे आणि कामासाठी बहुतांश लोकांची वर्दळ दिसून येणारे, सीएसएमटी(CSMT) स्थानक हे ऐतिहासिक काळातील महत्वाचे रेल्वेस्टेशन असल्याचे मानले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (फोटो सौजन्य-ट्वीटर)

मुंबईतील (Mumbai) सर्वात मोठे आणि कामासाठी बहुतांश लोकांची वर्दळ दिसून येणारे, सीएसएमटी(CSMT) स्थानक हे ऐतिहासिक काळातील महत्वाचे रेल्वेस्टेशन असल्याचे मानले जाते. तसेच आज (20 जून) सीएसएमटी स्थानकाला 132 वर्ष पुर्ण झाली असली तरीही त्याचे सौंदर्य पूर्वीसारखेच खुलून दिसते.

छत्रपती शिवाजी महाराज हे स्थानक मुंबईतील सर्वात मोठे रेल्वेस्थानक असून त्याची उभारणी आणि त्याच्यावरील नक्षीकाम हे पाहण्याजोगे आहे. त्याचसोबत युनेस्कोचे जागतिक वारसा लाभलेले असे हे रेल्वेस्थानक आहे. सीएसएमटीच्या परिसरात अनेक पर्यटक सुद्धा तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जगभरातून येत असतात.(लातूर येथे तयार झाले देशातील पहिले Grass Painting; 7 दिवस गवत उगवून साकारले शिवाजी महाराज (Video)

1978 मध्ये सीएसमटी रेल्वेस्थानकाची बांधणी करण्यास सुरुवात झाली होती. त्याच्या दहा वर्षानंतर या ऐतिहासिक अशा रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण झाले. (Photo Credits-Twitter)
मुंबईतील सर्वात मोठ्या रेल्वेस्थानकावर दिवाळीच्या वेळेस रोषणाई करण्यात येते. (Photo Credits-Twitter)
नवरात्रीच्या वेळेस नऊ रंगात सजून सीएसएमटी रेल्वे स्थानक सर्वांचे स्वागत करते. (Photo Credits-Twitter)
भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा ऐतिहासिक दिवस स्वातंत्र्य/ प्रजासत्ताक दिनाच्या वेळी सीएसएमटी स्थानकावर भारताच्या तिरंग्याची रोषणाई केली जाते. (Photo Credits-Twitter)

मार्च 1996 पर्यंत सीएसएमटी स्थानक व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जायचे. मात्र त्यानंतर त्याचे नामकरण करण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे ओळखले जाऊ लागले.