स्थलांतरित मजूरांना स्वगृही पाठवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोनू सूद याचे केले अभिनंदन

त्यासाठी अभिनेते सोनू सूद याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिनंदन केले आहे.

Governer Bhagat Singh Koshyari & Sonu Sood (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) धोका टाळण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) घोषित केल्यानंतर स्थलांतरीत मजूरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या मजूरांचा घरी परतण्याचा मार्गही बंद झाला. त्यामुळे अनेक मजूर जीवघेणा प्रवास करत स्वगृही परतू लागले. या प्रवासात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात श्रमिक ट्रेन्स सुरु झाल्याने मजूरांना दिलासा मिळाला. परंतु, मजूरांची संख्या लक्षात घेता अधिक मदतीची गरज होती. यासाठी अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने पुढाकार घेत सरकारवरील भार हलका करण्यास मदत केली. यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी सोनू सूद याचे फोन करुन अभिनंदन केले आहे. याची माहिती Governor of Maharashtra या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन मजूरांसाठी सोनू सूद याने गाड्यांची विशेष सोय केली. तसंच यासाठी त्याने कोणत्याही मजूराकडून पैसे आकारले नाहीत. जोपर्यंत शेवटचा मजूर घरी पोहचत नाही तोपर्यंत मदतीचा ओघ सुरु ठेवण्याचेही त्याने आश्वासन दिले होते. (बॉलिवूड अभिनेता सोनू सूद नंतर बिग बी देखील करणार उत्तर प्रदेशच्या मजूरांना मदत)

Governor of Maharashtra Tweet:

अभिनेता सोन सूद याच्या या कामगिरीचे कौतुक मंत्री जयंत पाटील यांनीही केले होते. तर क्रिकेटर शिखर धवन याने देखील सोनूच्या या कार्याला ट्विटच्या माध्यमातून सलाम केला होता. या व्यतिरिक्त सोनू सूदने कोरोना व्हायरसच्या संकटात विविध माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. पीपीई कीट पुरवण्यापासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी त्याने हॉटेल खुले करुन दिले होते.