गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाणे दप्तरी गुन्हा दाखल, शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याचे प्रकरण
त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उमटले आहेत. पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा बारामती पोलीस ठाणयात तक्रार दाखल केली होती
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवरुन गुन्हे दाखल केले जात आहेत. बारामती, पुणे, बीड येथे पडळकर यांच्यावर या आधीच गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता पालघर (Palghar) जिल्ह्यातील माणिकपूर पोलीस ठाणे (Manikpur Police Station) दप्तरीही गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, माणिकपूर पोलीसांनी मुळीक यांची तक्रार बारामती पोलिसांकडे वर्ग केली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत' असे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उमटले आहेत. पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा बारामती पोलीस ठाणयात तक्रार दाखल केली होती. त्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी बीड येथील शिरुर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंत आता वसई-विरार येथेही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पडळकर काय म्हणाले होते?
'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असे माझे मत आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही. त्यांची बहुजनांबद्दलची भूमिका आता सर्वसामान्य जनतेलाही लक्षात येऊ लागली आहे. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाबद्द पवार ज्या पद्धीतीने वागतात ते पाहिले असता गावगाड्यातील तळागाळातील समाजाशी ते कसा विचार करत असतील, हेही आता लोकांच्या लक्षात येत आहे. (हेही वाचा, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना' भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका)
पडळकर यांच्या वक्तव्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी कारवाईाच इशारा दिला आहे. पडळकर यांच्या वक्तव्याबाबत बोलताना देसाई यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण समोर आले त्याच दिवशी राज्याच्या पोलीस महासंचालकांना याबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. पडळकर यांनी केलेल्या वादक्रस्त विधानाची ऑडिओ, व्हिडिओ क्लीप तपासली जाईल. या तपासाचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे.