Mumbai Coastal Road Project: मुंबईकरांसाठी खुशखबर! कोस्टल रोड प्रकल्पाचे काम 70 टक्के पूर्ण; नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार पहिला टप्पा

कोस्टल रोड येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. येत्या 15 मार्चला दोन्ही टनेलचं उद्घाटन होणार असून या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पाचे काम 70 टक्के पूर्ण झाल आहे.

Coastal Road | (Photo Credits: BMC/Website)

Mumbai Coastal Road Project: मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी महानगरपालिका वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग तयार करत आहे. सागरी मार्ग, भुयारी मार्ग, खाडी पूल, सागरी पूल, उड्डाणपूल विकसित करून वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईच्या सागरी किनाऱ्यालगत कोस्टल रोड विकसित केला जात आहे. या रोडमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. कोस्टल रोड येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. येत्या 15 मार्चला दोन्ही टनेलचं उद्घाटन होणार असून या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पाचे काम 70 टक्के पूर्ण झाल आहे. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक दरम्यान साडेदहा किलोमीटरचा कोस्टल रोड प्रकल्पाचा हा पहिला टप्पा नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे.

कोस्टल रोडखाली चार भव्य कार पार्क आहेत, ज्यात 1,800 कार पार्क केल्या जावू शकतात. कोस्टल रोडच्या बाजूला एक सायकलिंग ट्रॅक देखील आहे. जो जमिनीच्या बाजूला असेल. या प्रकल्पाला BMC द्वारे निधी दिला जात आहे आणि त्यासाठी नागरी संस्थेचा 8,249 कोटी रुपये खर्च आला आहे. (हेही वाचा - Mumbai Coastal Road Project: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, DCM देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई कोस्टल रोड कामांचा आढावा)

 

मुंबई कोस्टल रोड हा गेल्या काही काळापासून राजकीय मुद्दा बनला आहे. प्रारंभी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारकिर्दीत, स्टिल्टवरील रस्ता अशी त्याची संकल्पना होती. नंतर डिझाइन बदलण्यात आले. भाजप-शिवसेना सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या बहुतांश परवानग्या मिळवल्या. ठाकरे यांच्या उपस्थितीत डिसेंबर 2018 मध्ये बीएमसीने या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यकाळात कोस्टल रोडचे उद्घाटन करण्यास उत्सुक आहेत आणि त्यांनी बीएमसीला डिसेंबर 2023 पर्यंत ते पूर्ण करण्यास सांगितले आहे. शिंदे यांनी MMRDA ला प्रकल्पाला ट्रान्सला जोडण्यासाठी वरळी-शिवरी कनेक्टरच्या बांधकामाला गती देण्यास सांगितले आहे.  हाजी अली, वरळी आणि अमरसन्स जंक्शन येथे कोस्टल रोडचे तीन इंटरचेंज आहेत. ईस्टर्न फ्रीवे ते मरीन ड्राइव्ह आणि नंतर कोस्टल रोडला बोगद्याद्वारे जोडण्याची एमएमआरडीएची योजना आहे.