MHADA : म्हाडा रहिवाशांसाठी आनंदाची बातमी, संपूर्ण थकीत भडे भरल्यास निव्वळ व्याजावर सवलत
मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी योजनेबाबत माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ही योजना जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Housing and Area Development Authority: तुम्ही जर म्हाडातील (MHADA ) रहिवासी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी म्हाडा हातभार लावणार आहे. त्यामुळे म्हाडाने एक योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यांमधील भाडेकरू, रहिवाशांनी संपूर्ण थकीत भाडे विहित मुदतीत भरल्यास निव्वळ व्याजावर सवलत मिळणार आहे. ही सवलत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या घर आणि संक्रमण शिबिर गाळ्यांसाठी असेल. प्राप्त माहितीनुसार अशा घर गाळ्यांची संख्या 21 हजार 149 इतकी आहे. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी ही माहिती बुधवारी दिली.
मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी योजनेबाबत माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ही योजना जाहीर करण्यात आली आहे.(हेही वाचा, MHADA Pune Lottery 2021 Result Live Streaming: पुणे विभागातील म्हाडाच्या घरांचा ऑनलाईन निकाल घरबसल्या इथे पहा!))
कशी असेल योजना?
- योजना दोन टप्यांमध्ये असेल.
योजना फेब्रुवारी- 2021 आणि मार्च -2021 या दोन महिन्यांकरता लागू असेन.
- पहिला टप्पात
28 फेब्रुवारी, 2021अखेर संक्रमण शिबिर गाळ्यातील भाडेकरू, रहिवासी यांनी भाडेरकमेची मुद्दल भरल्यास एकूण व्याजामध्ये 60 टक्क्यांपर्यंत सवलत.
- दुसरा टप्पा
31 मार्च, 2021 पर्यंत संपूर्ण थकीत भाडेरकमेची मुद्दल भरल्यास संक्रमण शिबिर गाळ्यातील भाडेकरू, रहिवाशांना एकूण व्याजामध्ये 40 टक्क्यांपर्यंत सवलत.
दरम्यान, म्हाडाच्या भाडेकरुंकडे मठ्या प्रमाणावर भाडे आणि त्यावरील व्याज असे एकूण सुमारे 129.92 कोटी रुपये थकीत राहिले आहेत. त्यामुळे भाडेकरुंनी घरभाडे भरावे यासाठी ही योजना जाहीर करण्यात आल्याचे घोसाळकर म्हणाले. भाडे थकीत असणाऱ्यांमध्ये संक्रमण शिबिर गाळ्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरू, रहिवाशांचा समावेश आहे.