औरंगाबादकरांसाठी खुशखबर! सिद्धार्थ उद्यान, प्राणीसंग्रहालय आजपासून खुले
तसेच लहान मुलांसह सर्वांना मास्क घालणे आवश्यक आहे
मागील वर्षा मार्च 2020 पासून कोरोना संसर्ग वाढल्यामुळे मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय असलेले सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद होते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हे उद्यान एक आकर्षण स्थळ आहे. पंरतु बंद असलेले सिद्धार्थ उद्यान (Siddharth Garden) आणि प्राणिसंग्रहालय 12 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारपासून खुले करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यापासून कुठे तरी फिरायला जाण्यासाठी आतुरलेली औरंगाबादकर आणि मुले सिद्धार्थ उद्यान बंद असल्याने नाराज होती. मात्र शुक्रवारपासून उद्यान आणि प्राणी संग्रहालय सुरु करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने (Municipal corporation) घेतला आहे.
सिद्धार्थ उद्यानात येणाऱ्या 18 वर्षांवरील नागरिकांना येथे प्रवेशाकरिता लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य आहे. तसेच लहान मुलांसह सर्वांना मास्क घालणे आवश्यक आहे, असे महानगरपालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले. (हे ही वाचा Pandharpur Ekadashi Special Train: वारकऱ्यांना रेल्वेकडून दिलासा, पंढरपूर येथील कार्तिकी जत्रेसाठी विशेष गाड्या)
प्राणीसंग्रहालयातील 14 वाघ हे प्रमुख आकर्षण ठरतात. उद्यानात आकर्षक पुतळे उभारून नवीन खेळणीही बसवण्यात आली आहे. तसेच प्राणीसंग्रहालयात वाघ, बिबट्या, तरस, नीलगाय, हरीण, मगर, शहामृग, वानर आदी प्राणी आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे महापालिकेने उद्यानात प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे.