Fox Rescued In Thane: औषधांच्या दुकानात कोल्हा शिरला! वनविभागाने पकडला, उद्यानात सोडला; ठाणेकरांनाही घडले कोल्होबाचे दर्शन
त्यांनी लागलीच वन विभागाला त्याची कल्पना दिली. मग वन विभागाचे कर्मचारी आणि काही प्राणीमित्र संघटना घटनास्थळी आल्या आणि त्यांनी कोल्हा पकडला. कोल्हा पकडल्यानंतर त्याची तपासणी केली असता तो कोल्हा जखमी झाल्याचे आढळले. जखमी कोल्ह्यावर उपचार करु त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आले.
Golden Jackal Fox Rescued In Thane: कोल्हा (Fox ) आणि त्याच्या लबाडपणाबाबत आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. खरेतर कोल्ह्याच्या या स्वभावाबाबत चक्क त्या कोल्ह्यालाही माहिती नसेल. चतूर माणसाने मात्र आपला लबाडपणा त्या बिचाऱ्या कोल्ह्यावर खपवला. असो. हे कोल्हापूराण सांगण्याचे कारण म्हणजे ठाणे (Thane) येथील खारकर आळी (Kharkar Ali In Thane) येथील एका औषधाच्या दुकानात ठाणेकरांना एक कोल्हा (Golden Jackal Fox) दिसला. ठाणेकरांना म्हणजे ठाण्यातील नागरिकांना. गिऱ्हाईकाऐवजी दुकानात कोल्हा पाहून दुकानदारही चांगलाच भांबावला. काहीसा घाबरला.
खारकर आळीतील श्री मेडिकल जेनेरिक फार्मसी या औषधाच्या दुकानात हा कोल्हा (गोल्डन जॅकल) शिरला. त्याच्या मागे कुत्रे लागल्याने बिचारा सैरावैरा धावत आश्रयासाठी औषधाच्या दुकानात शिरला. ठाणे येथून खाडी परिसर अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे आपली शिकार शोधण्याच्या नादात तो निघाला असावा आणि अचानक भरकडून तो नागरी वस्तीत शिरला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई, ठाणे, वसई, उरण परिसरातील खाडीच्या जंगलांमध्ये या प्रजातींचे कोल्हे प्रामुख्याने आढळतात. हे कोल्हे साधारण दोन ते अडीच फूट उंच आणि तीन ते साडेतीन फूट लांब असतात. (हेही वाचा, Deers Spotted In Pune: गवा दिसला, आता पुणे येथे हरणांचा कळप करतोय मुक्तसंचार; शिवणे परिसरात मानवी सोसायटीत वावर)
मनुष्य प्राणी पाहण्याची सवय असलेले नागरिक कोल्हा पाहून घाबरले. त्यांनी लागलीच वन विभागाला त्याची कल्पना दिली. मग वन विभागाचे कर्मचारी आणि काही प्राणीमित्र संघटना घटनास्थळी आल्या आणि त्यांनी कोल्हा पकडला. कोल्हा पकडल्यानंतर त्याची तपासणी केली असता तो कोल्हा जखमी झाल्याचे आढळले. जखमी कोल्ह्यावर उपचार करु त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आले.
काही प्राणीप्रेमी आणि नागरिकांनी सांगितले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि खाडी किनारी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे वज्यजीवांची जैवसाखळी धोक्यात आली आहे. खाडीमध्ये नवनिर्माणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भराव टाकले जात आहेत. या भरावांमुळे कांदळवनात असलेले वन्यजीव आता मानवी नागरी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणे येथील नागरी वस्तीमध्ये गवा शिरला होता. हा गवाही जंगलातून भरकटून नागरी वस्तीमध्ये आला होता. नागरिकांनी गवा पाहण्यासाठी गर्दी केल्याने गवा बिथरला. बचावासाठी तो सैरावैरा धावू लागला. यात तो जखमी झाला. पशुवैद्यकीय विभाग आणि वनविभागाने दिलेल्या माहितीमध्ये अतिरक्तस्त्राव आणि रक्तदाब अनियंत्रित झाल्याने गव्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते.