Gold Rates Today: गुढी पाडवा मुहूर्तावर सोन्याचे दर वाढले; मुंबई, पुणे, नाशिक सह राज्यातील मुख्य शहरातील भाव जाणून घ्या
आजचे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सहित महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर जाणून घ्या
हिंदू कालदर्शिकेचा पहिला महिना चैत्र आज 25 मार्च पासून सुरु होत आहे, गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa) निमित्ताने या नववर्षाची सुरुवात होते. याच मुहूर्तावर आज सोने चांदी (Gold -Silver Rates) च्या किमतीत देखील झळाळी पाहायला मिळत आहे. काल 24 मार्च रोजी किंचित उतरलेले सोन्याचे दर आज काहीश्या फरकाने पुन्हा वाढले आहेत. आज 25 मार्च रोजी सोन्याचा भाव मुंबईत प्रति 10 ग्रॅम मागे 41,647 रुपये इतका आहे. तर दिल्ली मध्ये सोने प्रति 10 ग्राम 41,942 या किंमतींत आहे. वास्तविक सोन्याच्या दरात जरी झळाळी आली असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या लॉक डाऊन मुळे सोने व्यवसायाला मात्र चांगलाच फटका बसला आहे. दुसरीकडे चांदीचा दोन दिवसापासूनच भाव कायम असून प्रति किलो दर 50,800 इतकी किंमत आहे. सोन्याचे आजचे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सहित महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील दर जाणून घ्या..
आजचे सोन्याचे भाव
मुंबई: 41,647
पुणे: 41,638
नाशिक: 41,645
नागपूर: 41,619
रत्नागिरी : 41,639
जळगाव: 41,608
कोल्हापूर: 41,627
(वरील दर प्रतितोळा 24 कॅरेट सोन्याचा goldpriceindia.com नुसार देण्यात आला आहे. )
दरम्यान, कोरोना मुळे शेअर बाजारावर सुद्धा काही दिवसांपासून मंदीचे सावट आहे, अगदी कमी अधिक फरकानेच सेन्सेक्स आणि निफ्टी च्या उलाढाली होत आहेत. वास्तविक अशा काळात सोने चांदीच्या व्यवसायाकडे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्ह्णून पाहिले जाते, मात्र लोकांना घराबाहेर पडणे सुद्धा आता शक्य नसल्याने हा ही व्यवसाय किंचित तोट्यात आहे असे म्हणता येईल.