Gold Rate on Gudi Padwa: गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबई, पुणे, नागपूर शहरांतील सोने चांदी दर जाणून घ्या
त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा हा सण आज (2 एप्रिल) मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. आजच्या दिवशी लोक खरेदीस प्राधान्य देतात. खास करुन दागिणे, वाहन आणि नव्या घरात गृहप्रवेश यांवर भर असतो. सहाजिकच आजचे सोने, चांदी दर यांबाब उत्सुकता असते. पाठिमागील काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातू असलेल्या सोने दरात काहीशी घसरण झाली होती. त्यात आता सुधारणा होत आहे. आज 22 कॅरेट असलेले 10 ग्रॅम सोने 48,100 रुपयांना विकले जात आहे. पाठिमागच्या ट्रेडचा विचार करायचा तर बाजार बंद झाला तेव्हा, हेच सोने 47,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर विकले जात होते.
गुड रिटर्न्स वेबसाईट नेहमी सोने, चांदी दर जाहीर करत असते. या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेले सोने, चांदी दर खालील प्रमाणे. (हेही वाचा, Gold Quality and Purity: शुद्ध असूनही 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जात नाहीत, जाणून घ्या कारण)
मुंबई
22 कॅरेट सोने- 48,10 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट सोने- 52,470 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
पुणे
22 कॅरेट सोने- 48,180 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट सोने- 52,550 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
नागपूर
22 कॅरेट सोने- 48,180 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट सोने- 52,550 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
चांदी- प्रती 10 ग्रॅम चांदीचा दर 676 रुपये दराने विक्री होत आहे.
इथे देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता.