Gold Rate Today: सोने-चांदीचा आजचा दर काय? जाणून घ्या राज्याच्या प्रमुख शहरातील सोन्याचे दर
आजही ही घसरण कायम पाहायला मिळाली. चांदीच्या दरातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही बाब गुंतवणूकदारांसाठी अतिशय दिलासादायक आहे.
Gold Rate on 23rd January: देशांतर्गत बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार दिसत आहेत. कालच्या सोन्याच्या दर काहीशी मोठी घसरण दिसून आली होती. ही बाब गुंतवणूकदारांसाठी अतिशय दिलासादायक आहे. सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांनाही सोन्याच्या कमी झालेल्या भावाचा फायदा घेता येईल. कोरोना संकटकाळात सोन्याचे दरात मोठे चढ-उतार दिसून आले. 50 हजारांवर गेलेले सोन्याचे दर आता कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जाणून घेऊया आजचा सोन्याचा दर महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये नेमका किती आहे?
आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर 49,140 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 45,045 इतका आहे. काल 24 कॅरेट सोन्याचा 48960 इतका होता. तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 44,880 इतका होता. आज या दरात काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल 477 रुपयांनी कमी झालेला सोन्याचा दर आज 180 रुपयांनी वधारला आहे. दरम्यान, सोन्याचा दर goldpriceindia.com नुसार प्रतितोळा 24 कॅरेट आणि 22 कॅरेट असा देण्यात आला आहे.
आजचे सोन्याचे दर:
शहर |
24 करेट/प्रतितोळा |
22 करेट/प्रतितोळा |
मुंबई | 50,319 रुपये |
48,629 रुपये |
पुणे |
49,870 रुपये |
47,530 रुपये |
नाशिक |
49,878 रुपये |
47,518 रुपये |
नागपूर |
49,904 रुपये |
47,514 रुपये |
सोलापूर |
49,891 रुपये |
47,561 रुपये |
चांदीच्या दरातही आज काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीचा दर 66,525 प्रति किलो इतका आहे. काल चांदीच्या दरात 970 रुपयांची घसरण होऊन हा दर 66,231 प्रति किलो इतका झाला होता. तर आज त्यामध्ये 494 रुपयांची वाढ दिसून आली आहे.