Gold Silver Price Today: सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी; दरात सलग दुसर्‍या दिवशी घट, पहा आजचा भाव

जो दर काल 4700 होता. तर 24 कॅरेट सोन्यासाठी आज 5123 रूपये प्रति ग्राम मोजावे लागणार आहेत. काल हा दर 5193 रूपये होता.

Image | (Photo credit: archived, edited, representative image)

भारतामध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये सलग दुसर्‍या दिवशी घट झाली आहे. 22 कॅरेट एक ग्राम सोन्याचा दर आज 4700 रूपये आहे. जो दर काल 4700 होता. तर 24 कॅरेट सोन्यासाठी आज 5123 रूपये प्रति ग्राम मोजावे लागणार आहेत. काल हा दर 5193 रूपये होता. आगामी सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावात झालेली घसरण ही खरेदीदारांसाठी आनंदाची बाब आहे. सोन्याचे दर अमेरिकेच्या वाढत्या व्याजदरांवर बर्‍याच अंशी अवलंबून असतात. कारण ते non-yielding bullion ठेवण्याची संधी खर्च वाढवतात. शुक्रवारी जॅक्सन होल, वायोमिंग येथे केंद्रीय बँकर्सच्या वार्षिक जागतिक मेळाव्याला संबोधित करताना फेड चेअर जेरोम पॉवेल यांच्या टिप्पण्यांवर सोने व्यापारी लक्ष ठेवून आहेत. हे देखील नक्की वाचा: One Nation, One Gold Rate: खुशखबर! देशभरात एकाच दराने विकले जाणार सोने; लवकरच लागू होणार ‘एक राष्ट्र, एक सोने दर’ धोरण .

भारतातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा दर

मुंबई - ₹47,000 (22 कॅरेट) ₹51,230 (24 कॅरेट)

पुणे- ₹47,030(22 कॅरेट) ₹51,260(24 कॅरेट)

नाशिक - ₹47,030(22 कॅरेट) ₹51,260(24 कॅरेट)

दिल्ली - ₹47,150 (22 कॅरेट) ₹51,440 (24 कॅरेट)

चैन्नई - ₹48,000 (22 कॅरेट) ₹52,400 (24 कॅरेट)

दरम्यान हे दर केवळ सोन्याचे भाव आहेत. सराफा दुकानामध्ये खरेदी केल्यानंतर TDS, GST आणि अन्य टॅक्स लावले जातील. सोनं खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी आता दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक केले आहे. त्यामुळे ते आहे की नाही हे तपासून घेणं आवश्यक आहे.

सोनं आता केवळ दागिन्यांपुरते मर्यादित राहिले नसून त्याकडे आता गुंतवणूकीचा पर्याय म्हणून देखील पाहिले जाते. नुकतीच Sovereign Gold Bond scheme सुरू करण्यात आली आहे. या सरकारी गुंतवणूक स्कीम मध्ये प्रतिग्राम 5197 रूपये दराने सोनं गुंतवण्याची सोय आहे. ऑनलाईन पर्याय निवडल्यास 50 रूपये सुट मिळेल.