Gold and Silver Rate Today: सोनं, चांदी खरेदीचा विचार करताय? पहा आजचा मुंबई, पुणे सह राज्यातील प्रमुख शहरातील दर

त्यानंतर ऐन दिवाळीच्या सणात सोन्याचे दर 40 हजारांवर जाऊन पोहचले होते. मात्र मंगळवारी सोन्याचे दर 550 रुपयांनी कमी झाल्याचे दिसून आले. तसेच चांदीचे दर सुद्धा 1200 रुपयांनी घसरले आहेत.

Jewellery (Photo Credits: Pixabay)

सोन्याच्या दरात गेल्या महिन्यापासून सातत्याने वाढ होताना दिसून आले. त्यानंतर ऐन दिवाळीच्या सणात सोन्याचे दर 40 हजारांवर जाऊन पोहचले होते. मात्र मंगळवारी सोन्याचे दर 550 रुपयांनी कमी झाल्याचे दिसून आले. तसेच चांदीचे दर सुद्धा 1200 रुपयांनी घसरले आहेत. 1 किलोग्रॅम चांदीची किंमत ही 15 ग्रॅम सोन्याच्या बरोबर मानली जाते. तर विविध राज्यांनुसार सोन्यासह चांदीचे दर बदलेले दिसून येतात. अनेक जण गुंतवणूक म्हणून देखील सोन्याचं बिस्कीट, सोन्याचं वळं विकत घेतात. मग त्यासाठी पहा मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख बाजारात आज नेमका सोन्याचा, चांदीचा दर काय आहे? चांदी खरेदी करण्यासाठी आजचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 485 रुपये आहे. तसेच 100 ग्रॅमसाठी 4850 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये सोन्याचा दर काय?

मुंबई - ₹ 37,400/ प्रति दहा ग्राम

पुणे - ₹  37,400/ प्रति दहा ग्राम

नाशिक - ₹  37,400/ प्रति दहा ग्राम

नागपूर - ₹ 37,400/ प्रति दहा ग्राम

चांदीचा दर मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे शहरामध्ये किती?

सोन्यापेक्षा चांदीचे दर अधिक वाढले असून मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे शहरासह अन्य ठिकाणी दर 48,500 प्रति किलो राहिले आहेत.

हे दर गुड ₹ रिटर्न्स (Good₹Returns) वेबसाईटनुसार दिले आहेत.