Valentine's Day: अमरावती येथील शाळेत विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ, 'हे फक्त मुलींनाच का?' पंकजा मुंडे यांचा सवाल
अमरावती जिल्ह्यातील चांदुर येथील महिला व कला महाविद्यालयात विद्यार्थिंनीना व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमविवाह न करण्याची तसेच हुंडा घेणाऱ्या मुलासोबत लग्न न करण्याची शपथ देण्यात आली आहे. मात्र, या सर्व प्रकारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रश्न उपस्थित करत मुलींनीचं अशी शपथ का घ्यावी ? असा सवाल केला आहे. तसेच शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ हा कमालीचा विचीत्र प्रकार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
आज संपूर्ण देशात 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) उत्साहात साजरा होत आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदुर येथील महिला व कला महाविद्यालयात विद्यार्थिंनीना 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने प्रेमविवाह न करण्याची तसेच हुंडा घेणाऱ्या मुलासोबत लग्न न करण्याची शपथ (Oath) देण्यात आली आहे. मात्र, या सर्व प्रकारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रश्न उपस्थित करत मुलींनीचं अशी शपथ का घ्यावी ? असा सवाल केला आहे. तसेच शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ हा कमालीचा विचीत्र प्रकार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
मुलींना अशा प्रकारची शपथ देण्यापेक्षा मुलांना शपथ घ्यायला लावा की, मी एक तर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावरही ऍसिड फेकणार नाही, जिवंत जाळणार नाही, मुलींना वाकड्या नजरेने पाहणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देईल, अशी संतप्त प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विट हँडलवरून दिली आहे. (हेही वाचा - Valentines Day 2020: पुणे पोलीस म्हणतात 'प्रेम शेअर करा , पासवर्ड नाही ')
दरम्यान आज 'व्हॅलेंटाईन डे'च्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील विदर्भ युथ वेलफेयर सोसायटी द्वारा संचालित महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना चक्क प्रेमात न पडण्याची शपथ देण्यात आली. या शाळेतील शिक्षकांनी सामाजिक कर्तव्य म्हणून विद्यार्थिनींमध्ये हुंडा देणाऱ्या मुलाशी लग्न करू नका किंवा भावी पीढीला हुंडा न घेण्याबाबत जागृत करा, अशा पद्धतीचं आवाहन केलं असलं तरी आज दिलेल्या शपथेत 'प्रेम व प्रेमविवाह करू नये,' असा सल्ला दिला आहे. त्यामुळे सध्या राज्यभर या शपथतेची चर्चा सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे.
काय आहे शपथेतील मजकूर -
मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पीढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसचं मुलीसाठी हुंडा देणार नाही. समर्थ भारतासाठी, स्वस्थ समाजासाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते.