Ghatkopar Balcony Fall: बाल्कनीतून पडून 15 वर्षीय SSC Topper जखमी; ट्यूटरविरोधात गुन्हा दाखल

घाटकोपर पूर्व येथील एका शिकवणी केंद्रात एसएससी परीक्षेत 94 टक्के गुण मिळवणारी 15 वर्षीय मुलगी बाल्कनीतून पडून गंभीर जखमी झाली. शिक्षकावर निष्काळजीपणा केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Ghatkopar Balcony Fall: बाल्कनीतून पडून 15 वर्षीय SSC Topper जखमी; ट्यूटरविरोधात गुन्हा दाखल
Injury | Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

Mumbai SSC Topper Accident: मुंबई शहरातील माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत 94% गुण मिळवणारी 15 वर्षीय मुलगी घाटकोपर (Ghatkopar) पूर्व येथील एका शिकवणी वर्गाच्या आवारात बाल्कनीतून उघड्या पार्किंग क्षेत्रात पडल्याने गंभीर जखमी (Ghatkopar Girl ) झाली. विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या यशाबद्दल एका कोचिंग सेंटरने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान ही घटना 14 मे रोजी घडली. सुरुवातीस या घटनेची फारशी वाच्यता झाली नव्हीत. मात्र, काही काळानंतर हे प्रकरण पुडे आले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, शिक्षक आणि संबंधित क्लासचालकाविरोधात गुन्हा (FIR Against Tutor) दाखल केला आहे.

अपुऱ्या सुरक्षेसाठी शिक्षक जबाबदार, पालकांचा आरोप

सदर घटनेस विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षक आणि क्लास चालक जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पीडित मुलीच्या पालकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, बाल्कनी जीर्ण अवस्थेत होती आणि योग्य सुरक्षा उपाययोजनांचा तिथे अभाव आभाव होता. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून, पंत नगर पोलिसांनी 38 वर्षीय शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 125(A) आणि 125(B) अंतर्गत निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवला, जो मानवी जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणण्याशी संबंधित आहे. (हेही वाचा; Maharashtra FYJC Admission 2025: महाराष्ट्र अकरावीच्या प्रवेश पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी नवे फिचर; 'Career Path' टॅबद्वारे मिळणार विविध करिअरबाबत मार्गदर्शन)

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्यूशन सेंटरने सुमारे 150 विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी आमंत्रित केले होते. कार्यक्रमादरम्यान पार्किंग क्षेत्रात ढोल वाजवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच वेळी ही घटना घडली. (हेही वाचा, Maharashtra FYJC Admission 2025: महाराष्ट्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ; शालेय शिक्षण विभागाची माहिती)

मुलीस न्याय मिळावा, आईची मागणी

जखमी झालेल्या विद्यार्थिनीच्या आईने, जी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील एका प्रतिष्ठित बँकेत काम करते, तिने माध्यमांना सांगितले की, “माझी मुलगी एक समर्पित विद्यार्थिनी होती आणि ती 9 वी पासून तिथे वर्गात जात होती. तिने मला सांगितले होते की केंद्र 14 मे रोजी दहावीच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. नंतर, मला तिच्या मैत्रिणीचा फोन आला की ती बाल्कनीतून पडली आहे.”

ती पुढे म्हणाली, “आम्हाला आढळले की तिचा उजवा हात फ्रॅक्चर झाला होता आणि तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूला सूज आली होती, तसेच रक्ताची गुठळी झाली होती. सुदैवाने, ती आता बरी होत आहे. या घटनेसाठी केंद्राचे कर्मचारी जबाबदार आहेत - त्यांनी तुटलेली रेलिंग दुरुस्त केली नाही किंवा कोणतीही सुरक्षा जाळी बसवली नाही. मला माझ्या मुलीला न्याय हवा आहे.”

बाल्कनीत प्रवेश प्रतिबंधित होता, शिक्षकांचा सावध पवित्रा

होणारे आरोप फेटाळून लावत आणि सावधगिरीचा पवित्रा घेत एका 38 वर्षीय शिक्षिकेने सांगितले की, “आम्ही 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आनंद साजरा करत होतो. मुलगी पाणी पिण्यासाठी पहिल्या मजल्यावर गेली होती. कामगिरी पाहत आणि फोटो काढत असताना, तिचा तोल गेला आणि ती पडली.” ही शिक्षिका पुढे म्हणाली, “आम्ही बाल्कनीच्या दारावर स्पष्टपणे एक छापील सूचना लावली होती की प्रवेश निषिद्ध आहे. तरीही, तिने परिसरात प्रवेश केला. ती एक हुशार विद्यार्थिनी आहे आणि आम्ही तिला तातडीने रुग्णालयात नेऊन कारवाई केली. आमच्या पाच कर्मचाऱ्यांनी कुटुंबाला आधार दिला आणि रुग्णालयात त्यांच्यासोबत राहिले.”

पोलिसांकडून एफआयआर दाखल, प्रकरणाची चौकशी सुरु

पंत नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेश केवले यांनी या घटनेची पुष्टी केली आणि म्हणाले, "भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. जबाबदारी निश्चित करण्यासाठी सध्या तपास सुरू आहे."

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).