Ghatkopar Hoarding Collapse Case: मुंबई क्राईम ब्रांच कडून होर्डिंगला Structural Stability Certificate देणार्या इंजिनियरला अटक
47 वर्षीय Manoj Ramkrishna Sanghu बीएमसी ने मान्यता दिलेला इंजिनियर आहे त्याने 24 एप्रिल 2023 ला कंपनीला Structural Stability Certificate दिले आहे.
मुंबई क्राईम ब्रांच (Mumbai Crime Branch) कडून घाटकोपर (Ghatkopar) च्या होर्डिंग़ कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये दुसरी अटक झाली आहे. EGO Media Private LTD या कंपनीला structural stability certificate देणार्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा 47 वर्षीय Manoj Ramkrishna Sanghu बीएमसी ने मान्यता दिलेला इंजिनियर आहे त्याने 24 एप्रिल 2023 ला कंपनीला Structural Stability Certificate दिले आहे.
घाटकोपरच्या या दुर्घटनेमध्ये होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून 17 जणांचा जीव गेला होता तर 75 जण जखमी होते. जोरदार वार्यामध्ये हे होर्डिंग कोसळले त्यामध्ये पहिली अटक इगो मीडीया प्रायव्हेट लिमिटेड च्या मालकाला म्हणजे भावेश भिंडेला झाली आहे. भावेशला राजस्थानच्या उदयपूर मधून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या होर्डिंगला त्याला परवानगी कुणी दिली आणि यामधून त्याने किती रक्कम मिळवली याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. Ghatkopar Hoarding Collapse Case: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी SIT कडून GRP ACP S Nikam यांना समन्स .
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कलम 304, 338, 337, आणि 34 अंतर्गत भावेश वर गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेनंतर मुंबई सह शहरातील अन्य मेट्रो शहरातही पालिका प्रशासन मान्सून आधी अलर्ट मोड वर आलं आहे. अनेक ठिकाणी पालिकांकडून होर्डिंगची प्रत्यक्ष तपासणी केली जात आहे. केवळ सर्टिफिकेट वर अवलंबून न राहता धोकादायक आणि बेकायदेशीर होर्डिंग्स हटवली जात आहेत.