Mumbai Local Trains: मुंबई लोकलमधून 'या' वेळेत प्रवास केल्यास सर्वसामान्य नागरिकांना भरावा लागेल इतका दंड
या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कामात अडथळा आणणे, तसेच सरकारी सूचनांचे पालन न केल्यास व्यवस्थापन कायदा आणि कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उपनगरीय रेल्वे सेवा (Mumbai Local Trains) बंद करण्यात आली होती. मात्र, जूनपासून टप्प्याटप्प्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अन्य महत्त्वाच्या सेवांमधील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर महिलांनाही लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. दरम्यान, सर्वसामान्यांनाही उद्यापासून मुंबई लोकलमधून प्रवास करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांच्यासाठी विशेष वेळ ठरवून देण्यात आली आहे. यामुळे त्यांना त्या वेळेतच प्रवास करावा लागणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांनी प्रवासी वेळ चुकवल्यास त्यांच्याकडून 200 रुपयांचा दंड आणि एक महिन्याचा तुरुंगवास या शिक्षेचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवेने प्रवास करता येणार नाही. सर्वसामान्य प्रवाशांनी प्रवासी वेळ चुकवल्यास 200 रुपयांचा दंड आणि एक महिन्याचा तुरुंगवास या शिक्षेचा सामना करावा लागणार आहे. हे देखील वाचा- Mumbai Local Trains: सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्यापासून मुंबई लोकल सेवा सुरु; कोणत्या वेळेत करता येणार प्रवास? पाहा संपूर्ण वेळापत्रक
या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कामात अडथळा आणणे, तसेच सरकारी सूचनांचे पालन न केल्यास व्यवस्थापन कायदा आणि कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. विविध कलमानुसार, 200 रुपये दंडाची तरतूद आहे. याचबरोबर 1 महिन्यापासून 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास अशा शिक्षेचादेखील यात समावेश आहे.