Gautami Patil Lavni Dance In Satara: पैलवानाच्या आग्रहाखातर लाडक्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील साताऱ्यात (Watch Video)

लागलीच मग गौतमीनेही आग्रह न मोडता एक भन्नाट लावणी केली. ज्यामुळे उपस्थितांचा कलेजा खलास केला.

Gautami Patil | (Photo credit: archived, edited, representative image)

गौतमी पाटील (Gautami Patil) म्हणजे विर्तमानकालीन तरुणाईतील लाखो दिलों की धडकण जणू. तिचे नाव जरी उच्चारले तरी अनेकांच्या नजरा कावऱ्याबावऱ्या होतात. त्यामुळे गौतमी पाटील (Gautami Patil Dance) हिचा कार्यक्रम (Gautami Patil Video) परिसरात कुठेही असला तरी उत्साही लोक आणि तिचे चाहते गर्दी करणार म्हणजे करणारच. सातऱ्यातही हाच प्रत्य आला. सातारा येथील एका पैलवानाने चक्क आपल्या बैलाचा वाढदिवस साजरा केला. बैलाच्या वाढदिवसासाठी या पैलवानाने चक्क गैतमी पाटील हिलाच निमंत्रण दिले. गौतमीनेही मग हे निमंत्रण स्वीकारले आणि अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढवले.

निमंत्रण स्वीकारुन कार्यक्रमाला आलेल्या गौतमी पाटील हिला बैलाच्या वाढदिवसानिमित्त एखादी लावणी सादर करावी असा अग्रह निमंत्रक पैलवानाने केला. लागलीच मग गौतमीनेही आग्रह न मोडता एक भन्नाट लावणी केली. ज्यामुळे उपस्थितांचा कलेजा खलास केला. सतीश भोसले असे या पैलवानाचे नाव. जे उभ्या पंचपक्रोशीत बैलगाडा मालक आणि पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. गौतमी येणार म्हटल्यावर चाहत्यांनी या कार्यक्रमाला जोरदार उपस्थिती लावली होती. दरम्यान, सतीश भोसले यांच्या बैलाचे नाव महाराष्ट्र चॅम्पीयन असे आहे. सातारा शहराजवळी खर्शी येथे हा कार्यक्रम पार पडला. (हेही वाचा, Gautami Patil at Khojewadi: अर्रर्र! पोराच्या वाढदिवसासाठी बापाने ठेवला गौतमी पाटील हिचा कार्यक्रम; सातारा जिल्ह्यातील खोजेवाडी येथे आयोजन)

व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

गौतमी पाटील सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेले व्यक्तीमत्व आहे. सर्वाधिक चर्चा असते ती तिच्या डन्सची. लावणीच्या नावाखाली ती करत असलेल्या डान्समध्ये ती ज्या प्रकारचे हावभाव करते त्यावर अनेकांचे आक्षेप आहेत. लावणीसम्राज्ञी म्हणून महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे अशा सुरेखा पुणेकर, छाया खुटेगावकर, यांच्यासह अनेकांनी तिच्या लावणी नामक नृत्यावर आक्षेप घेतला आहे. तरीही खरं सांगायचं तर गौतमी पाटील (Gautami Patil) म्हणजे आजघडीला तरुणांच्या गळ्यातील ताईत. नृत्यात ती करत असलेले हावभाव पाहून अनेक तरुणांचा कलेजा खलास होतो. त्यामुळे महाराष्ट्रातून गौतमीच्या कार्यक्रमांना जोरदार मागणी असते. तसेच, तिचे कार्यक्रमांना मोठी गर्दीही होते. गौतमी पाटील हिचे लावणी आणि विविध कार्यक्रमांतील व्हिडिओही जोरदार व्हायरल होतात.