Gautami Patil in Mumbai: गौतमी पाटील हिच्यासाठी उतावीळ तरुण वेडापीसा, पब्लिकने स्टेजसमोरच चोपला

गौतमी पाटील हिच्यासोबत डान्स करण्यासाठी स्टेजवर चढू पाहणाऱ्या उताविळ तरुणास पब्लिकने चोप दिल्याची घटना मुंबईत घडली. Gautami Patil प्रथमच मुंबईत कार्यक्रम करत होती.

Gautami Patil | (Photo credit: archived, edited, representative image)

गौतमी पाटील (Gautami Patil Dance) म्हटलं की, डान्स, अदा आणि राडा आलाच. महाराष्ट्रातील तमाम तरुणांचा कलेजा खलास करणारी व्यक्ती म्हणून अनेक लोक तिच्याकडे पाहतात. तिचा डान्स, उर्जा आणि ठेका अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतात. करिअरच्या सुरुवातीला केलेल्या चूका टाळून ती प्राण ओतून नाचते. तिचा नाच हाच तिचा 'यूएसपी' असल्याने तिच्या कार्यक्रमाला तरुणांची मोठी गर्दी असते. सहाजिकच गर्दी म्हटले की, वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येणे आलेच. या वेगळ्या लोकांमुळेच तिच्या कार्यक्रमात अनेकदा मोठा राडा होतो. कालच्या (7 सप्टेंबर) दहीहंडी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमातही असाच राडा झाला. एका उतावीळ तरुणाला पब्लिकनेच स्टेजसमोर चोप दिला. हा तरुण इतका वेडापीसा झाला होता की, त्याला स्टेजवरच जायचे होते आणि गौतमी पाटील हिच्यासोबत डान्स करायचा होता म्हणे.

महाराष्ट्रभर कार्यक्रम करणारी गौतमी मुंबईत प्रथमच कार्यक्रम करत होती. मुंबईत तिच्या कार्यक्रमांना कसा प्रतिसाद मिळतो याबाबत प्रचंड उत्सुकता होती. मात्र, मुंबईतही तिची चांगलीच क्रेझ असल्याचे पाहायला मिळाले. केवळ तरुणच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनीही तिच्या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. खास करुन दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदा पथकांतील गोविंदांनीही डीजे गाण्यांवर तिच्यासोबत ठेका धरला. 'ती आली, तिने पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं', असाच काहीसा कालचा प्रकार होता. गावखेड्यांमध्ये डान्स करणारी ती मुंबईसारख्या झगमगाटी दुनियेत तिला कसे स्वीकारले जाईल? असे अनेकांना वाटत होते. पण शहरातही तीची चांगलीच क्रेझ पाहायाल मिळाली. तिने काल मुंबई शहर आणि ठाण्यातील काही दहीहंडी कार्यक्रमांना हजेरी लावली. सर्व कार्यक्रम चांगले पार पडले मात्र मुंलूंडमधील कार्यक्रमात मात्र राडा झाल्याचे समजते.

व्हिडिओ

काय घडले नेमके?

दहीहंडी उत्सवानिमित्त गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान ती डान्स करत असताना एक तरुणी तिला पाहून चांगलाच बेभान झाला. त्याने स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. आयोजक आणि पब्लिकनेही त्याला समजावले. पण गौतमीच्या प्रेमात वेडापीसा झालेल्या या तरुणाला काहीही करुन स्टेजवरच जायचे आणि नाचायचे होते. ज्यामुळे कार्यक्रमस्थळी वातावरणही तंग झालं. अखेर पब्लिकचा संयम संपला. या तरुणास पब्लिकने चोप देण्यास सुरुवात केली. अर्थात, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत त्या तरुणाला पब्लिकच्या तावडीतून बाहेर काढले खरे. पण तोवर बराच उशीर झाला होता. पोलिसांना पोहोचेपर्यंत पब्लिकने त्याची चांगलीच धुलाई केली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement