Dombivli Fire in Labour Colony: डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील कामगार वस्तीत लागलेल्या आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट; एका कामगाराचा मृत्यू

या वस्तीत 150 हून अधिक कामगार राहत होते. आगीची माहिती मिळताचं कामगारांनी खोल्यांमधून पळ काढला.

Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

Dombivli Fire in Labour Colony: डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील कामगार वस्तीत लागलेल्या आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला असून आणखी एक कामगार जखमी झाला आहे. या आगीची माहिती मिळताचं अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कामगार वस्तीत ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, डोंबिवलीमधील मानपाडा रोडवरील रुणवाल मायसिटी फेज-2 प्रकल्पाच्या कामगार वसाहतीला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. परिणामी आग आणखी भडकली. यात एका कामगाराचा मृत्यू झाला. कामगार वसाहत परिसरात आगीमुळे धुराचे लोळ उठले होते. (वाचा - Mumbai Fire: मुंबईच्या गोरेगाव येथील एका स्टुडिओला आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल)

दरम्यान, मानपाडा कामगार वसाहतीत लागलेल्या आगीत कामगारांच्या तब्बल 120 खोल्या जळून खाक झाल्या आहेत. या वस्तीत 150 हून अधिक कामगार राहत होते. आगीची माहिती मिळताचं कामगारांनी खोल्यांमधून पळ काढला. मात्र, दुर्दैवाने या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला.

पुण्यातील सणसवाडी परिसरातील एमआयडीसी मधील एका कंपनीला शनिवारी भीषण आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.