Ganpati Visarjan 2020: मुंबई मध्ये गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी BMC च्या संकेतस्थळावर सर्वाधिक नोंदणी; पालिका भाविकांना समुद्रात उतरण्यास घालणार मज्जाव
मुंबई शहरात सर्वाधिक नोंदणी ही दक्षिण मुंबईमधील गिरगाव चौपाटीसाठी (Girgaum Chowpatty) झाली आहे. मात्र यंदा पालिकेने भाविकांना समुद्रात जाण्यासाठी मज्जाव केला आहे.
यंदा महाराष्ट्रासह जगभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) सेलिब्रेशनवर कोरोना व्हायरसचं संकट आहे. यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान गणेश चतुर्थीला आगमनासोबतच गणेश मूर्ती विसर्जनाची देखील विशेष सोय करत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यंदा विसर्जनासाठी पालिकेकडून ऑनलाईन नोंदणी करून घेतली जात आहे. त्यासाठी विशेष वेबसाईट आहे. त्यामध्ये मुंबई शहरात सर्वाधिक नोंदणी ही दक्षिण मुंबईमधील गिरगाव चौपाटीसाठी (Girgaum Chowpatty) झाली आहे. मात्र यंदा पालिकेने भाविकांना समुद्रात जाण्यासाठी मज्जाव केला आहे. पालिकेकडूनच काही स्वयंसेवक आणि कर्मचारी मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी समुद्रामध्ये जातील. अशी अट देखील आहे.
दरम्यान मुंबईमध्ये यंदा समुद्रावर आणि तलावात विसर्जनासाठी जाण्यासोबतच पर्यायी कृत्रिम तलावांची उपलब्धता करून देण्यासाठी आवाहन आणि प्रयत्न केले जात आहे. कृत्रिम तलावांमध्येच नागरिकांनी गणेशमूर्तींचं विसर्जन केल्यास नागरिकांची चौपाट्यांवर गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. Ganpati Visarjan Online Booking: गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी मंंडळ आणि नागरिकांना BMC कडे करावं लागणार Slot Booking; कुठे व कसे कराल बूकिंग?
shreeganeshvisarjan.com या पालिकेच्या वेबसाईटवर नागरिकांना विसर्जनासाठी ऑनलाईन वेळ घेता येणार आहे. यंदा 22 ऑगस्ट दिवशी गणपतीचं आगमन होणार आहे तर 27 ऑगस्ट दिवशी गौरी- गणपतींचं विसर्जन होईल. 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन 1 सप्टेंबर दिवशी होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2020 02:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

