Ganeshotsav 2022: मी शिवसेना बोलते, गणपती मंडळाकडून साकारलेल्या देखाव्यावर पोलिस कारवाई
कल्याणमध्ये विजय तरुण मंडळाने मी शिवसेना बोलते असा राज्यातील सत्तातरावर देखावा साकरण्यात आला होता, त्यावर पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे.
गणेशोत्सवाला (Ganeshotsav) दरवर्षी नवनवीप्रकारचे देखावे साकारण्यात येतात. वर्षभरात जो मुद्दा अधिक चर्चेचा असतो बहुदा त्यावर मंडळ दरवर्षी देखावा साकारताना दिसतात. पण यावर्षी राज्याभरात चर्चेचा ठरलेला मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील सत्तातर (Maharashtra Politics). केवळ राजकीय नाट्य हे राजकीय नेत्यांपर्यत मर्यादेत न राहून राज्यातील सर्व सामान्य जनतेत देखील हा चर्चेचा विषय ठरला. तरी राज्यातील विविध शहरांमध्ये या संबंधी गणपती मंडळाकडून देखावे (Ganpati Decoration) साकारण्यात आलेत पण पोलिसांकडून मात्र संबंधीत देखाव्यावर बंदी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेता या प्रकारच्या देखाव्यांना परवानगी नाकारण्यात आली. तरीही कल्याणमध्ये (Kalyan) विजय तरुण मंडळाने मी शिवसेना बोलते (Mi Shiv Sena Bolte) असा राज्यातील सत्तातरावर देखावा साकरण्यात आला.
शिवसेनेतील पक्ष निष्ठा या विषयावर चलचित्र देखावा साकारला होता. मात्र, या देखाव्यावर पोलिसांनी (Police) कारवाई केली असुन विजय तरुण मंडळा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या देखाव्यावर आज पहाटेच्या सुमारास कारवाई करत देखाव्याची सामग्री जप्त केली आहे. मंडळ विश्वस्त विजय साळवी यांनी सांगितले की मंडळातर्फे प्रत्येक वर्षी राज्यातील घडामोडीवर देखावा साकारण्यात येतो. यावर्षीच्या देखाव्यात देखील काहीही आक्षेपार्ह नव्हत. आम्ही या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार असून या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नसल्याचे साळवी यांनी सांगितले. (हे ही वाचा:- Ganesh Chaturthi 2022: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी गणरायाचं आगमन, पहा आरतीचा खास व्हिडीओ)
विजय तरुण मंडळाकडून साकारण्यात आलेल्या या देखाव्यात मोठा वृक्ष दाखवण्यात आला आहे. ज्याला शिवसेना असं म्हणटल्या गेलं आहे तर, या वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात अशा आशयाचा हा देखावा आहे. तरी पोलिसांकडून केलेली ही कारवाई मंडळाला मान्य नसून केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ मंडळाकडून गणेशमूर्तीची स्थापना करण्यात येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. विजय तरुण मंडळ हे कल्याणमधील एक प्रख्यात गणेश मंडळ असुन यावर्षी मंडळाचे 59 वर्ष पूर्ण होणार होते.