Gangapur Dam Water level Increases: नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस; गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ
यातून सर्वााधिक विसर्ग गंगापूर धरणातून होत आहे. गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
Gangapur Dam Water Level Increases: नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून नाशिकमधल्या 17 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यातून सर्वााधिक विसर्ग गंगापूर धरणातून (Gangapur Dam) होत आहे. गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली (Gangapur Dam Water Level Increases)आहे. त्यामुळे गोदावरीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नाशिक शहरात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कास सोमवारी गंगापूर धरणातून 8428 क्युसेकने पाणी सोडले गेले. त्यामुळे खवळलेल्या गोदवरी नदीची काही दृश्य समोर आली आहेत. (Mumbai Dam Water Level: मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! शहराला पाणी पुरवठा करणारी ३ धरणे पूर्णक्षमतेने भरली)
नाशिक जिल्ह्यातील 24 प्रमुख व मध्यम धरणांपैकी सुमारे 10 धरणे काठोकाठ भरली आहेत. गंगापूर धरणातून 8428 क्युसेकने पाणी सोडले गेल्याने शहरातील होळकर पुलावरून विसर्ग सुरू होता. 13046 क्युसेक इतका तो मोजला गेला. ही धोक्याची पातळी आहे. गोदावरी नदीला सलग दुस-या दिवशी पूरस्थिती आहे, परंतु ती अजूनही धोक्याच्या चिन्हाखाली आहे.(Jayakwadi Dam Water Level Increase: जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत 10 टक्क्यांची वाढ; गोदावरी नदीतील पाण्याच्या विसर्गामुळे पाणीपातळीत वाढ)
राज्यभर पाऊस पडत आहे. राज्यातील धरणांच्या पाणी पातळीचे चोवीस तास निरीक्षण केले जात आहे. धोकादायक परिस्थी निर्माण झाल्यास धरण क्षेत्रातील नागरिकांसाठी सतर्कतेची उपाययोजना करण्यात येणार आहे. गंगापूर, गौतमी गोदावरी आणि कश्यपी यांचा समावेश असलेल्या गंगापूर धरण संकुलातील पाण्याची पातळी मोठी आवक झाली आहे. दारणा संकुलात 86 टक्के जलसाठा असून गिरणा धरणात सध्या 80 टक्के पाणीसाठा आहे.
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू
त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, सुरगाणा येथे चांगला पाऊस पडत आहे. गंगापूर धरणांमधून गोदावरीत पाणी सोडल्यानंतर ते पाणी जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रवेश करते.त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ होते.