Gang Rape in Nagpur: नागपूर येथे सामूहिक बलात्काराच्या दोन घटना, 65 वर्षीय महिला आणि 17 वर्षीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
नागपूर (Nagpur) शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शहरात सामूहिक बलात्काराच्या (Gang Rape in Nagpur) दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये नराधमांनी एका 65 वर्षीय महिला आणि 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला आपल्या वासनेची शिकार (Gang Rape) केले. दोन्ही घटनांतील आरोपी वेगवेगळे आहेत.
नागपूर (Nagpur) शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शहरात सामूहिक बलात्काराच्या (Gang Rape in Nagpur) दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये नराधमांनी एका 65 वर्षीय महिला आणि 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला आपल्या वासनेची शिकार (Gang Rape) केले. दोन्ही घटनांतील आरोपी वेगवेगळे आहेत. नागपूर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, पहिल्या घटनेतील संशयीत आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सामूहिक बलात्काराच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे उपराजधानीचे हे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार 65 वर्षीय महिलेसोबत घडलेली घटना ही नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लावा परिसरात घडली. तर दुसरी घटना सामूहिक बलात्काराची असून ती जाफर नगर परिसरात घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार, घरात एकटीच राहणाऱ्या महिलेच्या घरात पहाटेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी प्रवेश केला. आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून एका संशयीतास ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. या घटनेबद्दल पोलिसांनी गुप्तता बाळगली असून तपास सुरु आहे. त्यामुळे घटनेचा तपशील अद्याप पुढे आला नाही.
नागपूर शहरातच आणखी एक बलात्काराची घटना घडली आहे. या घटनेतील पीडिता अल्पवयीन आहे. तिच्यावर चार आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेतही पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणत्याही आरोपीला अटक झाली नाही. पोलीस तपास सुरु आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, 17 वर्षीय पीडितेची काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. ही तरुणी या तरुणासोबत रविनगर परिसरातून बाईकवर बसून गेली होती. आरोपीने तरुणीला एका फ्लॅटमध्ये नेले तिथे त्याने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध प्रस्तापीत केले. त्यानंतर गुंगीत असलेल्या अवस्थेतच त्याने तीला रात्रभर फ्लॅटमध्ये ठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला एका मैत्रिणीच्या घरी पाठवून दिले.
आरोपी आहे की, पीडितेसोबत आरोपीच्या मित्रांनीही बलात्कार केला आहे. घटना घडल्यानंतर तरुणी साधारण आठवडाभर गप्पच होती. मात्र, अचानक प्रकृती बिघडल्याने कुटुंबपीयांनी तिला डॉक्टरांकडे नेले असता हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर कुटुंबीय आणि पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी चार तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2022 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

